Sunday, July 6, 2025
Homeसाहित्य'स्वप्नरंग स्वप्नीच्या' ( ८ )

‘स्वप्नरंग स्वप्नीच्या’ ( ८ )

अविनाश ला आठ दिवसांनी दिल्लीला जायच होत त्याच्या लेक्चर्स साठी..जवळ जवळ एक महिना तरी तिथे रहावं लागणार होतं…

त्याच्या डोक्यात रिटामावशी ने सांगितलेलं घोळत होत..! रोमीच्या वडलांचा काहीतरी बंदोबस्त करायचा होता..तो सतत टुरवर असणार, तो नसताना ह्यांनी त्रास दिला तर तिला..! त्याने ठरवलं संध्याकाळी कमिशनर साहेबांना फोन करून त्यांची वेळ निश्चित करू या आणि सल्ला घेऊ या..!

कॉर्पोरेट मध्ये असल्यामुळे सगळीकडे चांगली उठबस होती त्याची..! तेवढ्यात फोन वाजला..! रिटामावशी होत्या समोर, “तो रास्कल हॉस्पिटलमध्ये आहे..शेवटचे श्वास मोजतोय..रोमी ला भेटायचं म्हणतो..!” त्या रोमीच्या डँड ला रास्कल म्हणायच्या..!

अविनाश ने रोमीला फोन केला..खरच ! शेवटचे श्वास मोजत होते..! त्याना बघून ती निर्विकार होती…! रोमीला हात जोडत म्हणाला, “sorry, forgive me son” आणि प्राण सोडला.. प्रेमाने, लाडाने कधीतरी तिला son म्हणायचा..! तिने धीराने आणि मेहनतीने स्वतःच आयुष्य घडवलं होत म्हणून..!

खर तर, इतकं सोसून कोरड झालं होतं मन..! तरीही डोळे किंचित पाणावले..! तिला तिचच आश्चर्य वाटलं..! कधीतरी बापाने केलेल्या प्रेमाची किंचित ओल आहे तर !

डँड गेला आणि ती सुटली..! तिच्या सावत्र आईला तिचा भाऊ खूप त्रास देतो, अस ती रडत सांगत होती..! तसही दोघांमध्ये नातं आता उरलंच न्हवत..!
डँड चे अंत्यसंस्कार त्यानेच केले..! अर्थात आर्थिक खर्च हिनेच उचलला..!
एक नातं संपलं..!

अविनाश ला ही वाटलं, चला, एका काळजीतून मुक्त झालो..!
अविनाश ची जायची गडबड सुरू होती..सगळं काम परफेक्ट हवं..! त्यामुळे रोमीचीही नाचानाच सुरू होती..! रोमीशिवाय आता पान ही हलत न्हवत घरच्यांचं…! अविनाश निर्धास्त झाला होता..!

तो फ्लाइट मध्ये बसला आणि त्याची आई म्हणाली,  “बस बाई जरा, नंतर आवरु या पसारा” दोघी हसल्या.. “तरी तो असला ना, की घर भरलेलं असत ना आई “..! “हो ग बाई ! ते ही खरच !” अस म्हणत दोघी हसल्या..
तेवढ्यात रोमीच्या मैत्रिणीचा मिताली चा फोन आला..
“लपून छपून लग्न केलंस ना ! भेट ..! बघते तुला..! ह्या हॉटेलमध्ये उतरलीय मी..! उद्या भेटू या.” !

रोमीच्या आयुष्यात मितालीच्या रूपाने एक सुखाची झुळूक आली होती..! ज्यात स्वप्न आणि मजा दोन्ही होत..!

मैत्री हे जगातलं सर्वात अनोख आणि हवंहवंसं बंधन..! आयुष्यातल एक सुखाच पान..!
त्या आठवणीने तिने थोडा वेळ डोळे मिटले..!
रात्री सर्व आवरल्यावर दोघींचं चॅटींग सुरू झालं..!
क्रमशः

प्रतिभा चांदूरकर

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments