मिताली विचारत होती,
“कसा आहे अविनाश आणि त्याच्या घरचे स्वभावाने..”? रोमी म्हणाली, “तू घरीच ये… आणि बघ..” ! मिताली म्हणाली,
“नाही आधी उद्या हॉटेलमध्ये भेटू या… खूप गप्पा मारू या… मग नक्की येते..!”
त्यांचं चॅटींग सुरू होतं, तोवर अविनाश चा फोन आला..! त्याला सर्व माहीत होत मिताली बद्दल..! बघण्याची उत्कंठा ही होती.!. म्हणाला, “bad luck, अजून एक पोरगी पटवायचा चान्स गेला ग ..! “रोमी म्हणाली, “घरी ये… मग बघते तुला ह..!” त्यावर “हुस्नवाले, तेरा जवाब नही, कोई तुझ-सा नही हजारोंमें ..!” अस गायला लागला आणि ती लाजली..” प्रिये मिठीत ये ना..तुझ्याविना करमेना,” अस स्वतःच गाणं ही जुळवायला लागला आणि ती खळखळून हसली…” झोप आता, उद्या लवकर उठायचं असेल ना ! मी नाहीए ह उठवायला ! बाय.. टेक केअर..”! अस सगळं बोलून संभाषण थांबल…
मिताली चा लास्ट मेसेज भेटू या..बाय ! चा होता..
ती झोपण्याचा प्रयत्न करत होती आणि आधीच सगळं आयुष्य डोळ्यासमोर येत होतं…
बारावी नंतर तिने बी कॉम ला ऍडमिशन घेतली…! मॅनेजमेंट सब्जेक्ट घ्यायच ठरवलं होतच..! तिथेही ती टॉपर होऊन बाहेर पडली..!
“Deta analysis” हा विषय तिला खुणावत होता… एका मासिकात तिने त्या बद्दल वाचलं होतं..! त्यात मास्टर्स करायचं ठरवलं होतं..!
तिला स्कॉलरशिप मिळाली, ती ही शंभर टक्के मिळाली होती..! नोकरी ही नक्की मिळेल असा आत्मविश्वास ही होता..! बंगलोरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली..! तिला बरच वाटलं, घरापासून लांब जाताना..! कॉलेजमध्ये तिला मिताली भेटली..!
मिताली पुण्याची होती..रोमी मुंबईची..थोडे दिवसात दोघींचं छान सुत जुळलं..मग अभ्यास, मस्ती सगळं सुरू झालं..
रोमीला पार्ट टाइम नोकरी करावी लागे..! मिताली ला तशी गरज न्हवती खर तर..! रोमीमुळे ती ही पार्ट टाइम नोकरी करायला लागली..! दोघी एकाच ऑफिसमध्ये काम करायच्या..!
रोमीला पहिल्या पासून कष्टांची सवय होती. ! कामं वेळच्या वेळी करायची, अभ्यास ही..! मिताली थोडी आळशी होती, रोमीने तिला सांभाळून घेतलं..!
रोमी झपाटल्यासारखी काम, अभ्यास करायची.. ! मिताली तिचा स्पीड बघून अवाक होत असे..!
शनिवार, रविवार मात्र मजा करायच्या दोघी..! फिरायला, पिक्चर ला, हॉटेल मध्ये जायच्या..!
खूप एन्जॉय करायच्या..!
सुखाचे क्षण होते ते रोमीच्या आयुष्यातले.. ! इतकं सुंदर आयुष्य असत, ह्यावर विश्वास बसायलाच काही दिवस गेले..!
मिताली भेटल्यावर, अविनाश बद्दल किती बोलू आणि किती नाही, अस होईल ना आपल्याला..!
भेटीचे विचार मनात घेऊन ती गाढ झोपली..!
काय होईल त्या भेटीत ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800