Monday, July 14, 2025
Homeसाहित्यस्वयंसिध्दा

स्वयंसिध्दा

संयमी मूर्तीमंत रूप, तेजस्वी सक्षम गर्भागार,
स्वयंसिध्दा खंबीर नार,विधात्याचा दिव्य आविष्कार || ध्रु ||

माता, कन्या, भगिनी, सखी, रुपे लेवूनी भावदर्पणी
स्फूर्तीदायी गृहस्वामिनी, स्त्री धुरा सांभाळे समर्पणी..
जात संयमाची ललना, धगधगता तेज अंगार
स्वयंसिद्धा खंबीर नार, विधात्याचा दिव्य आविष्कार ||१ ||

नच संकटाचे कल्पिष, परी मन तिचे अबाधित
माणुसकीशून्य जगात, मर्यादा लांघावी परिमित
स्वयंप्रकाशी सौदामिनी, कधी न घेत असे माघार
स्वयंसिध्दा खंबीर नार, विधात्याचा दिव्य आविष्कार ||२ ||

स्त्रीशक्ती पणास लावते, ममता जोपासते उदरी. …
विश्वाची निर्मिती करण्या बाईजन्म झाला घरोघरी…
समाज विकृत रुढित, स्त्रीला नका समजू विकार….
स्वयंसिद्धा खंबीर नार, विधात्याचा दिव्य आविष्कार ||३ ||

वनिता पाटील

– रचना : सौ. वनिता राहुल पाटील. कोल्हापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments