लखुजींच्या पोटी जन्माली
शूरबाला राजमाता जिजाऊ
तलवार, दांडपट्टा घोडेस्वारी
कितीतरी गुणगान यांचे गाऊ
वाघिणीचे काळीज घेऊन
जन्म दिला शिवबाला
शत्रूवर तुटून पडायच
घाबरली नाही मृत्युला
शिवबाला दिले संस्कार
केले स्वराज्य स्थापन
जिजाऊंची ही शिकवण
महिलांना दिला मान सन्मान
अशा महान मातेला
करुया त्रिवार वंदन
देऊ मानाचा मुजरा
उधळून स्तुती सुमन

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर