१. राष्ट्रभक्त
राष्ट्रभक्त सावरकर
वीर स्वातंत्र्य सेनानी
मनोभावे आदरानी
दंडवत
स्वतंत्रता संग्रामात
अखंड स्वातंत्र्य गान
सोशिकता महान
चंदनाची
अंदमान कोठडीत
बहु सोशिल्या यातना
देशकार्य साधना
तेजोमयी
राष्ट्रप्रेमी साहित्यिक
उच्च विद्या विभुषित
प्रज्ञावान बुद्धिवंत
महाकवी
चतुरस्र व्यक्तिमत्त्व
कवी वकील लेखक
समाज सुधारक
पुरोगामी
देशाकार्या झिजविले
दिले आयुष्याचे दान
विसरून देहभान
देशासाठी
दूरदृष्टी कल्पांतीत
जिद्द अस्मिता प्रखर
क्रांतीसुर्य अजरामर
चिरकाल
— रचना : सौ तृप्ती सरदेसाई. मुंबई
२. अनादी मी अनंत मी.
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण मरण ते जनन
हिंदूतेजसूर्य उगवला
तेजाने तळपला
आसमंती झळकला
ध्रुवतारा झाला
ध्यास स्वातंत्र्य संग्रमाचा
वनवास तुरुंगवासाचा
दृढनिश्चयी विश्वासाचा
ज्वाज्वल्य राष्ट्रभक्तीचा
क्रांतीचा यज्ञकुंड
रचले षडयंत्र पुकारले बंड
अथक प्रयत्न अन् अफाट कष्ट
निश्र्चयाचा महामेरू जगाते उद्धारू
अथांग कार्य अन् अतुलनीय कर्तृत्व
नतमस्तक नेतृत्व
फिरंग्यांचेही धाबे दणाणले
यश कीर्तीचे शिखर गाठले
स्वतंत्रता देवीस सिंहासनी बैसविले
विनायक नाम सार्थ केले
जनसामान्यांच्या हृदयात रुजले
भारतमातेचे पांग फेडले
स्वातंत्र्यवीरांचे नाव अजरामर झाले
अभिवादन त्या तेजाला
उदात्त बलिदानाला
मूर्तिमंत योगदानाला
महाराष्ट्राच्या देवपुत्रला.
— रचना : मीरा जोशी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800