Sunday, October 19, 2025
Homeलेखस्वातंत्र्य देवतेचा विजय असो

स्वातंत्र्य देवतेचा विजय असो

स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरीक करू तुझी प्रार्थना
वंदे मातरम् म्हणा मुलांनो वंदे मातरम् म्हणा
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने स्वातंत्र्यदेवतेला शतकोटी प्रणाम.

ब्रिटिशांच्या श्रृंखलातुन मुक्त होऊन आपल्याला आज ७५ वर्षे झालीयेत. खरे म्हणजे हे स्वातंत्र्य भोगणारी आपली तिसरी पिढी. सरकारी शाळांमधल्या प्रगल्भ आणि देशभक्तीपर वातावरणात वाढलेली.

शाळेत किंवा कॉलेजमध्ये देखील १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन राष्ट्रीय सणांची अतिशय उत्सुकतेने वाट पाहणारी, आणि या सणांना आपल्याकडुन उत्कृष्ट काय करता येईल ही अहमहमिका सतत मनात जागृत ठेवणारी.

सकाळच्या प्रभातफेरी पासुन ते घरी आल्यावर दिल्लीतील सैनिकांच्या संचलनाकडे कौतुकाने बघत अत्यंत ज्वाज्वल्य देशाभिमान मनात साठवणारी पिढी आणि हा देशाभिमान मनात जागृत ठेवण्यास कारणीभुत होत्या आमच्या आधीच्या पिढ्या. आईवडिल, आजी आजोबा तसेच आमच्या शाळेचा आदरणीय शिक्षकवृंद. त्यांच्या तोंडुन इतिहास आणि देशभक्तांचे कार्य सतत ऐकुन भारतमातेचे स्थान आमच्या हृदयात उच्चतम अढळ आहे.

हा अमृतमहोत्सव सुद्घा खुप उत्सुकतेने सर्वत्र साजरा होणार आहे नक्कीच. पण जीवंतपणा आणि बेगडीपणा यातला फरक नक्कीच जाणवतो.

आजच्या पिढीला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी स्वातंत्रय सैनिकांची नावे माहित आहेत. पण त्यांच्या कार्याविषयी ते बऱ्यापैकी अनभिज्ञ आहेत. त्यांनी केलेला घरादाराचा, स्वप्नांचा त्याग या पिढीला कल्पनातीत आहे. अत्याचार म्हणजे काय ? पारतंत्र्य म्हणजे काय ? या सर्व गोष्टी त्याच्या विचारांच्या पलीकडे आहेत.

“तिरंगा लहराके आऊंगा या तिरंगेमे लपेटके आउंगा ।” असे माननीय सैनिकांचे आदरणीय विचार त्यांना पोरकट वाटतात. मुळात तिरंग्याचे महत्त्व त्याच्या तिन्ही रंगांचे महत्त्व अशोक चक्राचे आरे त्याचा अर्थ याबाबतीच ते उदासीन आहेत.

फास्ट लाईफ, कार्टुन्स आणि फास्टफुडच्या जमान्यात वाढलेली ही पिढी, फक्त स्वतःपुरताच विचार न करेल तरच नवल ! आणि या सर्व गोष्टींना खतपाणी घालणारे त्यांचे सो कॉल्ड इंग्लिश मिडियममधील शिक्षण.
आज भुछत्रासारखे उगवलेले इंग्लिश मिडियममधील साधारण शिक्षण, परदेशातील उच्चशिक्षण आणि आकर्षक पॅकेजेसमधील नोकऱ्या. ८० ते ८५ टक्के युवकवर्ग यामुळे भरकटला आहे. या राष्ट्रीय सणांकडे केवळ २-३ तासाचा कार्यक्रम आटोपुन दिवसभर सुट्टी असा दृष्टिकोन फक्त उरला आहे.

मला आठवते, आमच्या शाळेत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अनेक देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटक यात कार्यक्रम संपन्न व्हायचा. भाषण देतांना विद्यार्थ्यांची छाती अभिमानाने फुललेली असायची. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज बघतांना आमचे चेहरे उजळायचे. जर त्याला भाषण स्पर्धेत बक्षीस मिळाले तर इतरांच्या नजरेत त्याच्याविषयीचा आदर वर्णनातीत.

आज मात्र दृष्य वेगळे आहे. एक दोन भाषणांनंतर विद्यार्थ्यांची नृत्यकला सैराटच्या गाण्यांवर दिसुन येते. त्यांची भाषण विद्यार्थ्यांच्या गोंधळात पार पडतात. खरे म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन गोष्टींमधला फरक त्यांना कोणीतरी समजावुन सांगायला हवा.

माझी आई नेहमी गमतीने म्हणत असे, “एका पिढीने भारतीयांना इंग्रजांच्या गुलामगिरीतुन सोडवले पण पुढच्या पिढीने मात्र इंग्रजीची गुलामगिरी पत्करली” असो…..

तरीही स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या सर्व तनाने, मनाने भारतीय असणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सुजाता येवले

– लेखन : सुजाता येवले
– संपादन : अलका भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप