दरवर्षी प्रमाणे यंदा सुध्दा येत्या रविवारी १५ ऑगस्ट, २०२१ रोजी समस्त भारतीय आपला स्वातंत्र्यदिन मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. या शुभ दिनी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय ध्वजारोहणाचा देखणा, दिमाखदार समारंभ सोहळ्यास देश- विदेशातील प्रमुख नेत्यांची उपस्थित आवर्जून असते. सर्व देशभर जल्लोष असतो.
या देशाच्या उज्ज्वल इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्नं पाहिले.
ते प्रत्यक्षात साकारले गेले. ती परंपरा पुढे श्रीमंत पेशवे यांनी नेटाने पुढे नेली.
इ.स.१७५८ हे वर्ष भारताच्या सुवर्णाक्षरांनी क़ोरले गेले.या दिवशी मराठा सैन्यांनी सरहिंद,लाहोर जिंकले. त्यांनी सर्व यवनांना पिटाळून लावले. या मोहिमेचे नेतृत्व केले श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी. त्यांच्या सोबत मानाजी पायगुडे, नरसोजी ,तुकोजी हे कदम बंधु, गंगाधर बाजीराव रेठरेकर, नरसोजी पंडित, तुकोजी होळकर आदींची फौज होती. ही तर स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नंतर ब्रिटिशांविरुद्ध १८५७ साली प्रथम रणसिंग फुंकले. जालीयनवालाबाग येथे ब्रिटिशांनी क्रुरपणे केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप लोक मारले गेले. त्यात अनेक ज्ञात-अज्ञातांबरोबर समाज सुधारक, क्रांतीकारकही मारले गेले.
दुसरीकडे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शुरवीरांबरोबर सामाजिक बांधिलकी मानून कार्यरत राहणा-या कार्यकर्त्यात स्त्रीयांच्या स्वातंत्र्य- शिक्षणासाठी झटणारे महर्षी कर्वे, झांशींची राणी लक्ष्मीबाई, चाफेकर बंधू,सुधारक आगरकर, स्वा.वीर सावरकर,राजा राममोहन रॉय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,
डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरू, कॉ.डांगे, न.चि.केळकर, युसुफ मेहेर अली, आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदीराम बोस, अॅनी बेझंट, वीर कोतवाल, अशा असंख्य अगणित निरलस, निस्वार्थी अशा राष्ट्रप्रेमी जनतेचा उत्स्फूर्त सहभाग होता.
त्यावेळी प्रामुख्याने दोन गट होते. जहाल आणि मवाळ भूमिका घेणारे होते.जहालांच्या मते आधी स्वातंत्र्य मग सुधारणा तर,मवाळा़च्या मते आधी सामाजिक सुधारणा मग स्वातंत्र्य. दोन्ही पक्ष राष्ट्रप्रेमी होते.त्यांच्यात वैचारिक मतभेद जरी असले तरी त्या़ंच्यात राष्ट्रप्रेम, कळकळ होती यांमध्ये तीळमात्र शंका नव्हती.
लोकमान्य टिळक यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी महात्मा गांधी यांनी भरुन काढली. शांततेचे पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधीनी अहिंसा सत्य आणि असहकार याची त्यांनी कास धरली. दिवसागणिक ब्रिटिशांविरुध्दच वाढत चाललेला हा असंतोष जनतेच्या नसानसांत शिगोशिग भरला होता. इंग्रजांना राज्य करणे डोईजड होऊ लागले होते. ब्रिटनच्या संसदेतही त्याचे पडसाद उमटले होते. तेथील जनता नाराज होती. दुसऱ्या महायुध्दात मित्र राष्ट्रांचा विजय जरी झाला असला तरी त्या़ंची आर्थिक परिस्थिती बिकट होती..सरकार मधील अंतर्गत विरोध, विरोधी पक्षांचा विरोध, महागाईने जनता जेरीस आली होती. तिचा असंतोष खदखदत होता. शिवाय जागतिक दडपणही होते.परिणाम ब्रिटिशांना या देशाला स्वातंत्र्य द्यावे लागले;ते त्यांनी अखंडित न देता या देशाचे विभाजन करुन दिले.
फोडा,झोडा आणि राज्य करा या नीतीने भारत आणि पाकिस्तान या देशांची निर्मिती केली. १५ ऑगस्ट,१९४७ या ऐतिहासिक क्षणी शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबेटन,डॉ राजेंद्रप्रसाद,महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जयकर ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
१९४७ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर या़ंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घटना समिती स्थापन केली.त्यानुसार २६ जानेवारी,१९५०पासुन भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.डॉ राजेंद्रप्रसाद-राष्ट्रपती, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन-उपराष्ट्रपदी, लोकसभेचे सभापती- मावळकर, म़ंत्रीमंडळात:पं.जवाहरलाल नेहरु-पंतप्रधान,सरदार वल्लभभाई पटेल-गृहमंत्री,चिंतामणराव देशमुख- अर्थमंत्री,डॉ बाबासाहेब आंबेडकर-कायदा मंत्री,कृष्ण मेनन-संरक्षण मंत्री,केसकर-माहिती आणि नभोवाणी मंत्री ही मान्यवर नेते मंडळी मंत्रीमंडळात होती.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण हे साहित्य शास्त्र विनोदात रमणारे व्यक्तीमत्व होते.ते नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बेरजेचे राजकारण करण्यात माहीर होते.वाईचे पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी,दै.मटाचे संपादक, गोविंदराव तळवलकर,लोकसत्ताचे संपादक ह.रा. महाजनी आदी पत्रकारासह साहित्यकांशीही ते सहज संवाद साधायचे.
सकाळचे संस्थापक संपादक मा.नानासाहेब परुळेकर यांनी भाजी बाजारातील भाज्यांचे भाव सुध्दा छापीत असत.पत्रकार संपादक मा.विद्याधरजी गोखले हे बहुभाषिक होते, मराठी,हिंदी, इंग्रजी सह फार्सी,उर्दू,संस्कृतादी भाषेवर अनन्यसाधारण असे प्रभूत्व होते. मराठी संगीत नाटकाला त्यांनी संजीवनी दिली.ते नट,वक्ता दशसहेश्रू होते.सुधीर जोगळेकर, लक्ष्मीकांत जोशी, लक्ष्मीकांत देशमुख,साक्षेपी संपादक मा.सुनीलजी कर्णिक, वि.वा.शिरवाडकर,वसंत कानेटकर,बाळ कोल्हटकर,रत्नाकर मतकरी(गुढ- रहस्य)कथा लेखक, नाटककार,बाल रंगभूमीला संजीवनी देणारे नाटककार ही त्यांची खासियत होती. एक पात्री प्रयोगात पु.ल.देशपांडे, लक्ष्मण देशपांडे,गंगाधर गाडगीळ, के.ज.पुरोहित, दि.पु.चित्रे,श्री.दा.पानवलकरज्योत्स्ना देवधर,सुमेध वडावाला रिसबूड,डी.व्ही.कुलकर्णी, महावीर जोंधळे ,माधवी देसाई,अनंत सामंतादीनी आपल्या सकस, दर्जेदार लेखनी द्वारे मराठी साहित्यावर आपली मोहोर उमटवली.
विनोदी कथेत वि.आ.बुआ,सुधीर सुखठणकर, मुकुंद टाकसाळे यांनी मराठी साहित्य समृद्ध केले.प्रवास वर्णनात मीना प्रभू,रमेश मंत्री,रविंद्र पिंगे, ललित साहित्यात लालू दुर्वे,रेणू दांडेकर, चरित्र-आत्मचरित्रात वि.स. वाळिंबे,श्री व सौ. सदानंद नाईक, काव्य प्रांतात श्री.दि.इनामदार, अश्विनी धोंगडे,अर्थ-युद्ध यावर मराठी,इंग्रजी लेखन करणारे मिलिंद गाडगीळ,अर्थ विषयक सल्लागार विनायक कुलकर्णी, चंद्रशेखर टिळक,श्रीधर रंगनाथ कुलकर्णी, सं.मा.गर्गे, ,प्रा.वि.शं.चौघुले, विश्वास पाटील यांनी मराठी सृजन वाचकांचे अनुभव विश्व समृद्ध केले.
नाट्य,सिने सृष्टीतील निर्माते मोहन वाघ, भालजी पेंढारकर,राजा परांजपे,राजा ठाकूर, नवाथे, चंद्रकांत-सुर्यकात मा़ंढरे, सीमा-रमेश देव, दिग्दर्शक,संकलक नट राज कपूर,देव आनंद, दिलीपकुमार,संजीव कुमार,अशोककुमार, किशोर कुमार हे गांगुली बंधू, सत्यजित राय, व्ही.शांताराम,गुरुदत्त, संगीतकार, लता आशा या मंगेशकर भगिनी, गायक-गायिका सचिनदेव,राहुल देव बर्मन या पिता-पुत्र जोडीने सिने रसिकांचे कान तृप्त केले.नायक- नायिका, खलनायक-खलनायिका, विनोदी नट,नट्या,छायाचित्रकार यांच्यामुळे दीडेक शतकांपूर्वी दादासाहेब फाळके यांनी लावलेले सिनेमाचे इवलेसे रोपट्याचा आज त्याचा महावृक्ष झाला आहे.
आज भारतात सर्व भाषेत एकूण हजारेक चित्रपट निर्माण होत आहेत.जगात अव्वल एक नंबरची आपली ही फिल्म इंडस्ट्री आहे.
एका भाषेतील साहित्य त्याचे अन्य भाषेत अनुवाद व्हावेत, याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने इ.न.१९५४ साली साहित्य अकादमी तसेच नॅशनल बुक ट्रस्टची स्थापना १९५७स्थापना केली. अनुवादित साहित्या शिवाय अन्य भाषेतील उत्कृष्ट साहित्यालाही अकादेमी पारितोषिक देऊन गौरव करीत आहेत.अनुवादित साहित्यात ज्यांच्या नावावर साठेक पेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यात प्रकाशजी भातंब्रेकर,या़ंचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. याशिवाय अनुवादक म्हणून उमा कुलकर्णी, इन्फोसिसचे नारायण मूर्ती या़च्या अर्धांगिनी सुधा मूर्ती,ही काही ठळक नांवे आहेत.
दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या सचिवपदी डॉ.के.श्रीनिवास राव तर प्रादेशिक सचिवपदी मा.कृष्णा कि़बहुणे हे कार्यरत आहेत.
कुष्ठरोग्यांच्या सेवेला वाहून घेतलेला आमटे परिवार, अमरावतीचे पटवर्धन, उद्योजक टाटा समूह, अंबानी,अदानी, किर्लोस्कर,चितळे बंधू, गोगटे,यांनी व्यवसाय करीत असतांनाच अनेकांना अन्नाला लावले.देशी मालाला उठाव मिळावा म्हणून छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देत आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम आझाद हे मुळचे वैज्ञानिक. इस्त्रो येथे कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शानाखाली भारताने अ़ंतराळात़ मिसाईल यान सोडले होते.
विज्ञान-तंत्रज्ञान-अवकाशातही भारताने उत्तुंग भरारी मारली आहे. तळागाळापर्य़त विज्ञानाच्या प्रचार- प्रसारासाठी कटीबध्द असलेल्या संस्थेपैकी एक म्हणजे मराठी विज्ञान परिषद गेल्या ५५ वर्षांपासून कार्यरत आहे.विविध शाळा, महाविद्यालय, खुल्या वर्गासाठी स्पर्ध,गच्चीवरील बाग असे शेती-विज्ञान विषयक विविध उपक्रम, व्याख्यानमाला (आकाशवाणी,दूरदर्शन) आयोजित करीत आहेत.यात परिषदेसह मा.बाळ फोंडके, डॉ जयंत नारळीकर, अ.पां.देशपांडे,वसंत गोवारीकर, किशोर कुलकर्णी,दिलीप हिर्लेकर, डॉ.विवेक पाटकर,डॉ.सुरेश भागवत, हेमंत लागवणकर या मान्यवरांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
१९३४/३५ मध्ये रिझर्व्ह बँकची स्थापन झाली.बॅक ऑफ बॉम्बे, कलकत्ता,आणि मद्रास या बॅंकांचे विलीनीकरण केले.त्या इंपीरियल बॅंक ऑफ इंडिया या नावाने कामकाज करु लागली.बॅकिंग क्षेत्रातही आमुर्लाग बदल केले गेले.केंद्रीय अर्थ मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी इंपीरियल बॅंकेबरोबर सर्व संस्थानिकांच्या बॅंकांचे राष्ट्रीकरण करुन त्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि त्यांच्या सात सहयोगी बॅंका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.खाजगी विमा कंपन्यांचे भारतीय(आयुर्विमा) जीवन विमा महामंडळ या नावाने राष्ट्रीयकरण केले.
विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी मानून उल्लेखनीय कार्य करणा-यांना भारतरत्न,पद्म पुरस्कार, अर्जून पुरस्कार, दादासाहेब फाळके, पुरस्कार,खेल रत्न,हल्लीच पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या निरज चोप्रा यांनी भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.शिवाय अन्य स्पर्धेतही सिल्वर,ब्रॉस, पथक पटकावली आहेत.
पाहता पाहता आपल्या देशाने सर्वच क्षेत्रांत नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे.आज जगात भारताने आपली पत, प्रतिष्ठा, प्रतिभा आणि प्रतिमेला एव्हरेस्ट शिखरावर नेऊन ठेवले आहे. आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.कोणत्याही विशेषतः शत्रुंची आपल्या कडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतच होणार नाही.
समस्त भारतीयांच्या वतीने आपला देश पूर्वीप्रमाणे सुवर्ण भूमी म्हणून ओळखल्या जावो हीच सदिच्छा.
जय हिंद.
– लेखन : नंदकुमार रोपळेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800