स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दांजली…..
हे जन्मभूमी ! हे कर्मभूमी !
हे मातृभूमी ! हे राष्ट्रभूमी !
करतो त्रिवार तुज वंदना
स्वीकार करी तू आई
सिद्धीस कार्य मम नेई
आशीर्वाद तू आज देई
ठेवितो तव चरणी माथा
दुजा मार्ग नसे अन्यथा
घे त्रिवार शपथ मी आज
उतरीन शत्रूचा माज
करतो त्रिवार तुज वंदन
मी पुत्र तुझा, तू आई
शिरी वरदहस्त ठेवी
कार्य सिद्धीस नेई
की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास तो जाणे
शत्रूचा माज उतरीन
दास्यत्व झुगारून देईन
पायीच्या शृंखला तोडीन
तुज स्वातंत्र्ये मढवीन
शत हलाहले प्राशीन
परि स्वतंत्र तुज करवीन
जरी आवळे फास फाशीचा
ना डगमगे पुत्र हा तुझा
देह दंड सोशीन
घाबरे तया अंदमान
वाढवीन तुझा बहुमान
पडो फंदा फाशीचा
न सोडणार असिधारा व्रता
परि स्वतंत्र तुज करवीन
स्वातंत्र्य आभूषणे चढवीन
तोडून पायीच्या शृंखला
तुज अर्पीन सुवर्ण मेखला
जगी नाव तव झळकवीन
स्वातंत्र्य मुकुट चढवीन👑
हिंदुराष्ट्र म्हणवीन
हा विनायक बाळ तुझा आई
न भिवविती तया सिद्दी, अफजलखान
हो वचनबद्ध मी आज
तुज स्वतंत्र मी करवीन
तुज स्वतंत्र मी करवीन
तुज स्वतंत्र मी करवीन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचे चरणी अर्पण🙏🌹🌹🌹🌹🌹

– रचना :सुलभा गुप्ते. सिडनी, ऑस्ट्रेलिया
सुंदर कविता