विश्वनाथ, भुवनेश्वरीच्या
उदरी जन्मला नरेंद्र
गुरू श्री परमहंसांच्या
कृपेने झाला विवेकानंद..१
बाल नरेंद्रला मिळाले
आध्यात्मिक सुसंस्कार
व्यायाम, वादन, गायनात
होता सहज त्यांचा वावर..२
“माझ्या बंथू भगिनींनो”
शब्द शिकागोत उच्चारले
त्यांच्या ओजस्वी भाषेने
सारेच मंत्रमुग्ध जाहले..३
योग वेदांताचा केला
साऱ्या विश्वात प्रसार
भारताचे नाव उज्ज्वल
ऐकता अनमोल विचार..४
रामकृष्ण मिशन आणि
बेलुर मठाची स्थापना
जनतेचा करू उध्दार
हीच त्यांची मनोकामना..५
निद्रिस्त झालेल्यांवर
केला विचारांचा वार
अनमोल विचार देवुनी
निष्क्रियतेवर प्रहार…६
सांगे प्रत्येक जिवात
अंश वसतो ईश्वराचा
मनुष्यतत्व जागृत करण्या
प्रयत्न सर्वांनी करायचा..७
विवेकानंद जयंतीला
पाळतो आम्ही युवादिन
विचारधारा आचरता
ऊगवेल देशात सुदिन..८
— रचना : डॉ दक्षा पंडित. सँनडिआगो, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800