जेष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे भीष्माचार्य, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख, मराठीतील अनेक ग्रंथाचे लेखक जेष्ठ विचारवंत, सुप्रसिध्द व्याख्याते स्व. डॉ. ल. रा. नासिराबादकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेल्या “व्यवहारिक मराठी” आणि “मध्ययुगीन मराठी वाड्:मयाचा इतिहास” या ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते व अनेक विचारवंतांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथील छ. शाहू स्मारक भवन येथे झाले. भाषा विकास संशोधन संस्था आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी डॉ. ल. रा. नसिराबादकर यांच्या जीवनावरील आणि साहित्यावरील परिसंवादात अनेक दिग्गज साहित्यिक सहभागी झाले होते.
डॉ. नसिराबादकर यांच्या कन्या निवृत्त प्राध्यापिका, डॉ. सनीता लेंगडे व मुद्रण क्षेत्रातील नामवंत चिरंजीव सुनील नसिराबादकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

— लेखन : डॉ. रमाकांत दगडे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800