भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध प्रकारचे महोत्सव, कार्यक्रम साजरे करण्यात येत आहे .
“हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत ग्रुप केन्द्र, केंद्रीय रिझर्व्ह पुलिस बल, (केरिपुबल- CRPF) नागपुर च्या वतीने साजरा करण्यात येत आहे.
पोलिस उपमहानिरीक्षक श्री प्रशांत जाम्भोलकर,
यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रिय परिवार कल्याण केन्द्र नागपुर च्या वतीने काल, दिनांक 10/08/2022 रोजी सकाळी 08 वाजता ग्रुप केन्द्र, केरिपुबल नागपुर ते अम्बाझरी तलाव स्वामी विवेकानंद पुतळ्यापर्यंत सायकल रैली चे आयोजन करण्यात आले.
या रैलीत पोलिस उपमहानिरीक्षक, श्री सुभाष चन्द्र आणि ग्रुप केन्द्र केरिपुबल चे अनेक राजपत्रीत अधिकारी, अधिनस्थ अधिकारी, जवान, त्यांच्या परिवाराचे सदस्य तसेच रेन्ज कार्यालय नागपुर, संयुक्त हॉस्पिटल नागपुर, 213 महिला बटालियनचे अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते. यावेळी डिजीटल, प्रिंट मिडियाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
भारतीय स्वतंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात स्वातंत्र्य संग्रमातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्याच्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतविलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमानसात राहावी तसेच स्वातंत्र्याचा इतिहास संस्मरणात राहावा यासाठी देशभरात हर घर तिरंगा उपक्रम राबविला जात आहे. ह्या उपक्रमाची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी न्यूज पेपर, विविध चॅनल्स, बॅनर्स, शाळेतील मुलांच्या प्रभात फेऱ्या, सायकल रॅली, सरकारी कर्मचारी, शाळा, कॉलेज, नागरी हौसिंग सोसायट्या यांच्यासाठी सरकारी फतवे अशा प्रकारच्या अनेक माध्यमातून जनजागृती केली जात आहे. हर घर तिरंगा उपक्रमासाठी राष्ट्रीय ध्वज विक्री, वितरण करण्यासाठी विविध स्तरावर वितरण केंद्र यांची सुविधा करून दिलेली आहे.
मुख्यता देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही स्वातंत्र्य लढ्याच्या घटना, क्रांतिकारकांचा इतिहास, स्वातंत्र्यचे स्फुलिंग जन माणसात तेवत राहण्यासाठी सरकारला विशेष कार्यक्रम राबवावा लागतो हे सरकारचे अपयश आहे. सरकारला त्याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी सशुल्क राष्ट्रध्वज विकत घेण्याची छुपी सक्ती केली जात आहे. स्वस्त धान्य दुकानात राष्ट्रध्वज विकत घेतला तरच राशन मिळत आहे. देशातील काही नागरिकांना आपल्या कुटुंबियांच्या एक वेळच्या जेवणाची चिंता आहे त्यांनी राष्ट्रध्वज कसा विकत घ्यावा? ज्यांना घरेच नाहीत त्यांनी तिरंगा कोठे आणि कसा लावावा?
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी सरकारांना देशातील गरिबी हटविता आलेली नाही. प्रत्येक तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार निर्माण करता आला नाही. देशातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. प्रत्येक उत्पादक यांना आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे पण शेतकऱ्याला नाही ही शिकांतिका आहे.
त्यामुळे भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम राबविणे साठी सरकारचा जो प्रयत्न चालू आहे तो कितपत योग्य आहे आणि किती यशस्वी होईल याचा अभ्यास करावा लागेल. देशभक्ती, स्वातंत्र्य अभिमान प्रत्येकाच्या मनामनात ठासून भरायला हवी होती. त्यासाठी ७५ वर्षे निरंतर प्रयत्न करायला हवे होते.
🌹भारतातील प्रत्येक देशवाशीयांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌹
🙏धन्यवाद
मोहन आरोटे
🌹मेरा भारत महान 🌹
सुंदर उपक्रम