लहानपणी आईबाबा किंवा आजी आजोबांबरोबर हॉटेल मध्ये जायचो तेव्हा सर्व प्रथम टेबलावर ठेवलेले मेन्यू कार्ड बघायला मला खूप आवडायचे. तसे तर आम्हा मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी आईबाबांना माहित असल्यामुळे ते आधीच सर्व आॅर्डर देऊन टाकायचे. पण माझ्या अंगात किडा लहानपणापासूनच वळवळायचा आणि हात पण शिवशिवायचे ते मेन्यू कार्ड बघायला.
मी आपली ते कार्ड बघून त्यामध्ये असलेले विविध प्रकारच्या पदार्थाची यादी बघायची. पण किंमत मात्र बघायची नाही हो .कारण ती आकडेमोड आपल्याला कधी जमलीच नाही.आधीच गणिताशी वैर . मग कोण उगाच ते अंक बघत बसायचे. जाऊ दे ते न बघितलेलेच बरे. पण मेन्यू कार्ड मात्र रंगीबेरंगी चित्र असलेले छान वाटायचे.
आज अचानक मी मेन्यू कार्ड बदल का बोलते असे तुम्हाला वाटत असेल न. तर सांगते तुम्हाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मला एक आयडिया सुचली कि मी सुद्धा एक मेन्यू कार्ड काढणार ते फक्त आणि फक्त आमच्या या दोघा खडूगळ्यांसाठी. त्याचे झाले असे कि आजकाल ही दोघेही रोज जेवणाच्या तक्रारी करत आहेत. रोज रोज हेच का बनवले तेच का बनवले. जरा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी कर. यु ट्युब वर बघं आणि कर.
आता इथंच तर आमचं घोडं अडतं न. मैं और मेरा स्वयंपाक अक्सर ये बाते करते हैं असं काहीसं.
पण त्यादिवशी दिवस भर यु ट्युब वर रेसिपीजचे जितके मिळतील तेवढे व्हिडिओ बघितले. काही हॉटेलची पण व्हिडिओ बघितले. मग माझ्या टक्कुऱ्यात एक ट्युब झटकन पेटलीच. अरे हे तर आपलेच रोजचेच जेवण आहे फक्त नावे बदलली पाहिजे. आता यासाठी काही तरी आयडियाची कमाल केली पाहिजे. डोके जरा चालवुया म्हणताच एक आयडिया सुचली.
पटकन या दोघांना म्हणजे आमच्या दोन्ही वारसांना घेऊन एक व्हाट्सअप गृप केला आणि आठवड्याचे मेन्यू कार्ड तयार करुन पाठविले. ते मेन्यू कार्ड असे होते.
सोमवार::
ब्रेकफास्ट :: पोटॅटो पोहा विथ लेमन अॅन्ड कोरियॅन्डर
लंच:: ब्रिंजॉल विथ किडणी बिन्स , कुकूंबर रायता, राईस अॅड दाल तडका
डिनर ::: ऐग आम्लेट विथ आनियन कोरियॅन्डर, चपाती
मंगळवार
ब्रेकफास्ट:: पोटॅटो स्टफ पराठा विथ कर्ड अॅन्ड वेजी लेडि फिंगर विथ चिली गार्लिक
लंच :: मटार पनीर विथ फुल्ल टोमॅटो जिंजर गार्लिक , रोटी, राईस विथ यलो करी
डिनर :: वेज पुलाव विथ कॅबेज रायता एन्ड फ्राय पापड
बुधवार
ब्रेकफास्ट::: उपमा विथ लेमन अॅन्ड कोरियॅन्डर
लंच ::: रोटी, स्प्रिंग आनियन विथ चिली गार्लिक, एग पोटॅटो करी विथ कोकोनट टोमॅटो, लेमन पिकल
डिनर :: टाको बेल स्टफ्ड विथ कॅबेज आनियन टोमॅटो
गुरुवार
ब्रेकफास्ट:: मिक्स स्प्राऊट करी विथ ब्रेड अॅन्ड कोरियॅन्डर लेमन, मिक्श्रर
लंच :: दिल लिव्ह वेज विथ चिली गार्लिक, मटार करी विथ कोकोनट टोमॅटो,राईस अॅन्ड रोटी, बटरमिल्क
डिनर :: ड्राय स्माॅल झिंगा विथ जवार रोटी
शुक्रवार
ब्रेकफास्ट:: वरमिसिली उपमा विथ चिली कोरियॅन्डर
लंच :: चिकन करी विथ कोल्हापूरी चिली कोकोनट, खुश्का राईस, आनियन टोमॅटो रायता, लेमन,चपाती
डिनर :: चिकन पकौडा,राईस, करी दोपहर की
शनिवार
ब्रेकफास्ट:: इडली चटणी
लंच :: बॉटल गोल्ड वेज विथ टोमॅटो अॅन्ड कोरियॅन्डर, रोटी, मॅगो पिकल, कॉलिफ्लावर, राईस अॅन्ड कढीपकौडा
डिनर ::: फ्राईड राईस
रविवार
ब्रेकफास्ट::: चिली राईस विथ करी लिव्ह/ लेमन राईस
लंच :: मटण / चिकन बिर्याणी,रायता
डिनर :: मटण / चिकन बिर्याणीच, रायता शिल्लक असला तर ठिक नाही तर ओन्ली कर्डच.
हुश्श झाले तयार मेन्यू कार्ड. हे मेन्यू कार्ड पाहिल्यावर दोघांनी मिळून अशा ईमोजींचा पाऊस केला होता की काय सांगू.
“अम्मी ऽऽऽऽ
“हो रे बाळांनो..!!! बघा एवढे तरी शिकले हो यु ट्युब वर बघून.”
नंतर शेवटी मी मेसेज केला
जगात भारी आम्ही कोल्हापुरी….!!!!!
तर कसे वाटले माझे मेन्यू कार्ड हे सांगायला विसरू नका हो !

– लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
हाहा!😂 लय भारी, आमची परी! चविष्ट मेनू सोबत मस्त खुमासदार शैलीत लेखन! मजा आली वाचून!👌❤️👌
व्वा खूपच छान.. हलकं फुलकं मस्त