Tuesday, September 17, 2024
Homeसंस्कृतीहलकं फुलकं

हलकं फुलकं

खिरापत

उद्या गणरायांचं आगमन होणारै. त्यानिमित्ताने ही👇सहज सोप्पी नि तरीही जीभेला तजेलदारपणा आणणारी ’खिरापत’.😜😋😋👇👇👇👇
(तुम्हीही करता नं ?☺️)

“ममा, व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी“ 😋😋

मिहिर, माझ्या भाचीच्या लेकाची तात्काळ प्रतिक्रिया आली खिरापत खाल्ल्यानंतर नि मी खूश होऊन पहातच पाहिले.

मोठ्ठे मोठ्ठे डोळे करत, खिरापतीच्या आलेल्या पांढऱ्या मिशा मिरवत, तोंडाने टाॅsक् असा आवाज करून मिटक्या मारत मिहिर 👌👌

live likes देत होता.😃

“मावशी, मी vegan diet follow करतो, त्यामुळे….”

“अरे, ह्यात फक्त ‘सुकं खोबरं, पिठीसाखर नि वेलदोडा, एवढेच घटक आहेत”

भाचीच्या नवऱ्याने वाक्य पूर्ण करायच्या आधीच मी खुलासा (सोप्या मराठीत explain 😛) केला.

विसावं असो की एकविसावं, (शतक म्हणतेय मी 😉) जावयाची ऐट असते सासरी !😎

“तेच तर नं ! 👍मी हे खाऊ शकतो. मला ‘once more’ द्यायचाय ह्या प्रसादाला खरंतर, असं सांगत होतो तुम्हाला 😀”

हां ! म्हणजे खिरापत एकदम ‘योss’ 🤙 झालीये हे लक्षात येऊन, असा प्रसाद करायच्या माझ्या निर्णयावर माझी मीच
खूश झाले.🤓

आणि…..

ह्या पारंपरिक पदार्थाबद्दल लिहायची ऊर्मी आवरेना.

काजू मोदक, आंबा मोदक, मलईपेढे, ड्रायफ्रुट बर्फी…… असे अनेक शाही पर्याय प्रसादासाठी प्रचलित आहेत.

(वाॅवs अशी रिॲक्शन मिळवणारया शाही गोष्टींची उपलब्धता आणि वारंवारिता पहाता त्या आता सामान्य होऊ लागल्यायत की काय अशी शंका घ्यायला “वाव” आहे. ☺️☺️)

नाही म्हणजे प्रसाद म्हणून ही सगळी नावं भारीचैत !👌 पण ….

ह्या सगळ्या शाही मांदियाळीत आजही खिरापत आपली “पत” टिकवून आहे असं मला नेहमी वाटतं.😌
शिवाय पारंपारिक गोष्टी आवर्जून केल्या तर त्या पुढे ‘झिरपण्याची’ शक्यताही वाढते.😊

गणराय जरी काही दिवसांचे पाहुणे असले तरी प्रसाद-मिठायांची संख्या तशी मोठी असते.

पूर्वी कसं होत असे की ‘आई, हातावर दे नं काही ‘ असं मागणारे बाल-हात अवती भवती होते त्यामुळे पेढे-मोदकांचा सहज फन्ना उडत असे.
किंवा,
‘आऊचा काऊ तो माझा मावस भाऊ, मग करणं मस्ट 😛असलेल्या त्याच्या केळवणाच्या / वाढदिवसाच्या निमित्ताने, सासूबाई दुधी किंवा गाजर हलवा अथवा खवा-पोळी वगैरे करण्याची टूम काढत असत. मग हे ‘पेढे-मोदक त्यात बळी
पडून सगळ्यांच्या गळी उतरून सहज संपत असत.😀

आताशा घरात दोघंच दोघं !😊 तेही एक महत्त्वाचं कारण आहे, खिरापत करण्यामागे ! 😳

म्हणजेss उरली तरी शीतेस्ट कप्प्यात ठेऊन टप्प्याटप्प्याने वापरता येते.😀

कृती म्हटलं तर सहज नि सोपी !
सुक्या खोबऱ्याची मध्यम आकाराची १ वाटी किसून घेतली.
पॅनमध्ये खोबऱ्याचा तो कीस हलकेच शेकवला.
गार झाल्यावर त्यात घरी दळलेली साखर अंदाजाने (चवीनुसार) मिक्स केली. २ चमचे खसखस सुध्दा हलकी भाजून मिक्स केली. (Optional), ह्या मिश्रणात स्वादासाठी वेलदोड्याची पावडर मात्र घालायला हव्वीच !👍

ह्या सगळ्या कोरड्या घटकांचं मिश्रण खाणाऱ्याच्या जिभेवर मात्र ‘ओलावा’ निर्माण करतं नि तो त्याच्या डोळ्यातून तात्काळ व्यक्त होतो.😍

  • खिरापत ह्या नावाची मात्र मला गंमत वाटते.

वास्तविक एका विशिष्ठ प्रकारच्या काकडीचं नाव खिरा असं असतं. त्या प्रकारच्या काकडीपासून बनते त्याला पचडी (पत नसल्यागत वाटणारं) असंही म्हणतात.😆
आणि…
खिरा पूर्णपणे ॲबसेन्ट असलेल्या पदार्थाला मात्र नाव आहे खिरापत !!🤓

तर….

अशी ही थोडक्यातूनही (साहित्य थोडं, कृतीसाठीचा वेळही थोडा) अधिकची गोडी नि आनंद* देणारी खिरापत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी म्हणून जमली तशी सजावटही केलेय बर्रका !!

अजून काही माहिती किंवा टीप्स असतील तर अवश्य सांगा.😊

आणि हो !! शेअर ही अवश्य करा म्हणजे आनंद नि गोडी जोडीनंच वाढेल. 🙏🙏

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments