“व्हॅलेंटाईन 😍 कीचनमधला 😜”
आज ही 👇शेवट गोड असलेली पुरी ची कैफियत !! ( रेसिपी लेखन नव्हे हं !)👇
फरफट न होता, वर्षानुवर्ष ‘जगन्नाथाची’ पुरी’ तेवढी ‘स्थिर’ राहिल्येय. 😀 अन्यथा ‘पुरी’च्या नशिबी साsरखी हलवाहलव😔
आज ‘व्हॅलेंटाईन’ च्या निमित्ताने सग्गळे “Happy Happy” असतील म्हणून म्हटलं मनातली कैफियत ‘पुरी’ मांडावी. 😊
‘पुरी’चा स्थायीभाव तसं म्हटलं तर ‘नरम’च !!
नात्यानं तिची ‘घट्ट’ जोडी ‘शिऱ्या’ बरोबर ! 😋😋
अगदी सनातन !!
पण….. !
खूप्प बदलायला लावतात सगळे तिला !!
कधी ‘कुर्मा’ तर कधी ‘छोले’ साद घालतात, जबरदस्तीने डेटिंगला नेतात. 😏
बटाटा भाजी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ ॲक्सेप्ट करायला लावत असतानाच मध्येच पातळ भाजी ‘गळी’ पडते.
अहो, एखाद्याने जुळवून तरी किती म्हणून घ्यावं ? 🤨
‘भाजी’ म्हणून नावात जरी साधर्म्य असलं तरी प्रत्येकीचा ‘धर्म’ अन् ‘पोत’ निराळा !!
(Secular वाद्यांचे डोळे वटारलेले 😖 दिसतायत पण…😄)
धर्म म्हणजे, ‘ब.भा. तशी मवाळ नि सर्वसमावेशक’ तर पातळभाजी अंमळ तेज !! आणि पोत म्हणाल तर ब.भा. मध्ये अज्जिबात ‘ओलावा’ नाही, पा.भा.च्या अगदी विरूंध्द पक्षी !! 😛 तरीही सर्वांना,
रागे रागे पुरी बिचारी
‘टम्म’ फुगुनी साथ करी !! 😐
अगदीच ‘मध्यमवर्गीय’ म्हणून ‘वर्गवारी’ करून नाकारत 😒 गेली काही वर्ष ‘शिरा-पुरी’च्या जोडीची फारकत केलीय अनेकांनी !!
परंतु आज नेन्यांच्या घरी ‘व्हॅलेंटाईन मंगल कार्या’ 😉 निमित्त ‘गेट-टुगेदर’ होतं नि आपली ‘roots’ विसरता कामा नये म्हणून मेन्यु मात्र होता अग्गदी पारंपरिक !! 😃
शिगोशिग भरलेल्या (up to brim level हं) “शिऱ्याच्या” बाऊल कडे (म्हंजे ‘बोल’ च म्हणायचं होतं मला) बघतांना प्रत्येक पुरी, ‘गुलाबी’ होत होत अगदी ‘टम्म’ फुगत होती.
(आज ‘adjustment’ म्हणून नाही तर ‘मिलना’च्या आशेतल्या आनंदाने ‘फुग्गा’ झाला होता. 😀)
हळ्ळुच एका ‘पुरीची-शिरयाची’ गाठ बांधली नि ‘गोडवा’ अस्सा घासागणिक रेंगाळत राहिला म्हणून सांगूss 😌😋😋
आजकालच्या सारखा ‘बेत्ताच्या गोड शिऱ्या’चा बेत नसून पक्क्या गोडीचा शिरा तो ‘नेन्यांकडचा’ !! 😃
(‘नेन्यां’ कडे ‘माधुर्य’ नि ‘गोडी’ला काय तोटा ह्होs!! 😀)
मग काssय,
म्हटलं कैफियत मांडल्यानंतर “शिरा-पुरी’ची ही ‘प्रेम-कथा’ ही तुमच्या बरोबर शेअर करावी. 😊
प्रेम-पुजारी ‘व्हॅलेंटाईन’ ने एवढी ‘दिवसा’ ढवळ्या परवानगी दिलेय तर … (खाताना किंवा अन्य कशातही…..😆) ‘गोsडीsत’ कमतरता कश्शाला, नाही का ?? 😛

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800