Home Uncategorized हळदीकुंकू : महिलांचे आरोग्य

हळदीकुंकू : महिलांचे आरोग्य

0

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी” असे म्हटले जाते. या उक्तीनुसार विरार येथील जोशी बाल रुग्णालयाच्या डॉ. अर्चना जोशी आणि डॉ हेमंत जोशी – या बालरोगतज्ञांनी महिलांसाठी मकरसंक्रांती निमित्त हळंदी कुकुवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात परिसरातील सुमारे पाऊणशे महिलांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाने महिलांमध्ये आपसांतील गोडवा वाढण्या बरोबर त्यांच्यात आरोग्य प्रबोधनही घडले.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनीक गणेशोत्सवाद्वारे स्वातंत्र्य चळवळीचे कार्य केले. आता स्वातंत्र्य मिळाले आहे. पण स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी प्रथमतः महिलांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. त्यांना आरोग्याचे ज्ञान असले तर त्याचा फायदा त्यांच्या मुलांना होतो. त्याचबरोबर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचे प्रबोधन घडून ते विद्यार्थ्यांना आरोग्याबाबतचे योग्य ते मार्गदर्शन करू शकतात.
त्यायोगे येणारी पिढी हि आरोग्य संपन्न होवून ती देशाला उन्नतीला चांगला हातभार लावु शकेल. तसेच या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या समाजावर होवून संपूर्ण समाज आरोग्य सक्षम होवू शकतो, असे जोशी दांपत्यांनी म्हटले.

अशा प्रकारचे कार्यक्रम खेडोपाडी विशेषत: आदिवास प्रवण भागात झाले तर तेथील आदिवासी सेविका, शिक्षीका, समाजसेविका तसेच समाज सेवी संस्था यांना आरोग्य शिक्षणाचा लाभ होवून या भागातील समग्र समाज निरोगी होवून क्रिडा, सैन्यदल, शिक्षण, राजकारण इत्यादी ठिकाणी चांगली कामगिरी करून देशाच्या उन्नतीला मोठा हातभार लावू शकतात असे आम्ही मानतो, असे मत जोशी दाम्पत्याने व्यक्त केले.

निरंजन राऊत

– लेखन : निरंजन राऊत. विरार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version