Wednesday, July 2, 2025
Homeलेखहळवी पाखरं…..

हळवी पाखरं…..

अभ्यास क्रमाचा एक भाग म्हणून आम्हाला अनेक संस्थांना भेटी देऊन त्याचा अभ्यास करावा लागत असे. त्या दिवसांचा असाच एक ह्रदयस्पर्शी अनुभव संग्रही आहे. तो आपल्याला सांगतेय.

आम्ही सगळ्या विद्यार्थिनी mental hospital ला भेट देण्यास गेलो होतो. तिथे पांढर्या वस्त्रांना निळी किनार लावलेले एक सारखे कपडे घातलेले, अस्वस्थ अवस्थेत फिरताना आपल्याच विश्वात रमणारे, आपल्याशीच रडणारे, आपल्याशीच हसणारे वाट्याला आलेले दुःख, अपयश न पचवू शिकणारे हळवे जीव बघितले.

त्या क्षणी वाटलं ही हळवी माणसे कोणीतरी जपायला हवी होती. जगाने वेडे ठरवलेल्या या माणसाजवळ पैसा, वेळ, घर, नाती सगळे असेल, पण मग सगळं एकाएकी शून्य का झाले ? इथे प्रत्येकाचे आपले आपले जग होते. खूप मागे सुटलेला क्षण मुठीत बांधण्याचा प्रयन करत आहेत सगळे.

आज ची जाणीव होताच घाबरतात ते, आज स्वीकारताच येत नाही त्यांना एखादे लहान मूल जसं आपल्या गुलाबी हातानी वाळु चे घर बनवतं आणि खूप आनंदी होत नाचू लागतं पण वाऱ्याने ते घर उडवून नेले की आकांत तांडव करत, रडत पण एका विशिष्ट काळानंतर त्या लहान मुलाला आपलीे निरागसता सोडून, वाळूची घरे खचणारीच असतात ही जाण याविच लागते ..…..हे न साधलेली ही
हळवी पाखरं…

जिथे महिला रुग्णांना ठेवतात त्याला ‘महेर‘ असे नाव दिले होते. या महेरघरात सगळ्या मनसोक्त वावरत होत्या आपल्या आपल्या कल्पना विश्वात रमल्या होत्या. तिथेच एक दिसायला अतिशय सुरेख, पंजाबी मिश्रित हिंदी बोलणाऱ्या माहिलेशी माझी ओळख झाली. ती मनोरुग्ण असल्याचे तिने घातलेल्या झाब्यावरून तेवढे लक्षात यायच.

बोलणं, वागणं अगदी नीट आणि बेताच. बोलण्यात माधुर्य, लोभस चेहऱ्यावर चे ते गोड हास्य. तीच नाव देखील तिला साजेसं, ‘मनमोहन’ तिनं हसून पाहुण्यांगत आमचं स्वागत केलं ‘नामस्ते दीदी’ आम्हाला आमची नावं विचारली, आपली ओळख दिली माझ्या सोबत च्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या मी माझ्या नकळतच तिथ खोळंबले.

मनमोहन ने माझी तंद्री तोडली ‘दीदी मै आपको गाना सुनाऊ ?’ मी होकारार्थी मान हलवण्या आधीच मनमोहन गाऊ लागली ,’ दुनिया मे आये है तो जिना ही पडेगा जिंदगी है जहर तो पिना ही पडेगा ‘ मी मनमोहन च्या तोंडुन हे गाणं ऐकून थक्कचं झाले, जगाने वेडी ठरवलेल्या मनमोहन ला जीवनाचा अर्थ असा गवसवा ? मी विचारले ये गाना किसने सिखाया ? क्षणाचा ही विलंब न करता मनमोहन बोलली, ‘जालंधर मे बाबूजी ने सिखाया था’. कोण हे बाबूजी, हे जहर तिच्या हातात देऊन कुठे निघून गेले असावे ? मनमोहन ची case faile secret box मध्ये होती म्हणजे ती बघता येणार नव्हती. तीच्या गोड हसण्या मागच्या वेदनांचे कारण secret box मध्ये अबोल बसले होते.

कारण कुठले पण का असे ना, चातक पक्ष्याचे होत असेल ना कधी तरी असे श्रावणा च्या प्रतीक्षेत आपले मन तीळ-तीळ जाळत असताना धीर खचत असेल आणि तहानच हरवत असेल, गरजच काल्पनिक विश्वात रमून जात असेल ….. आणि मग श्रावणाच्या सरी कोसळल्या तरी पाण्याचा गारवा, ओलावा त्याला कोरडाच भासत असेल, असेच झाले असावे काहीसे. प्रेम, भावना, आपुलकी करपण्या आधी अलगद जपायला हवी ना। वटवृक्षाची मुळ किती खोलवर रुजली असतात दगडासारखे मजबूत वृक्ष ते पण त्याची होऊन त्याच्या मिठीत विरघळलेली नाजूक वेल जपतोच ना हळुवारपणे. वेळ निघून गेल्यावर मनाची दार उघडणार्या सगळ्याच कळा वांझ ठरतात.

परत जाताना मनमोहन भेटली जणू कोणाला तरी शोधत होती मी दिसताच माझ्या जवळ आली आणि माझा उजवा हात आपल्या हातात घेत त्याची ओंजळ केली, मी घाबरल्याचे भाव माझ्या चेहऱ्यावर इतके स्पष्ट होते की ते तिने क्षणात वाचले आणि म्हणाली,  ‘ना दिदी घबराना नहीं मैं violent petiant नही हूं।’
Metron शेजारीच होत्या त्या म्हणाल्या, ‘घ्या ती फुलं जो कोणी तिचं गाणं ऐकून घेतो त्यालाच ही फुलं देते’.

मनमोहन ने तिच्या हातातल्या कळकट्ट पुडक्यातुन पांढरी शुभ, टवटवीत अशी मोगऱ्याची सुगंधी फुलं काढून माझ्या ओंजळीत ठेवली. ती फुलं बघून एक ही क्षण जगण्याची इच्छा नसणाऱ्या ला देखील आपण परत एकदा आपल्या आयुष्यातील मोगरा शोधावा अस वाटावं. माझ्या ओंजळीतली ती मोगऱ्याची फुलं आणि मनमोहन चे निरागस हास्य यात काहीच अंतर नव्हतं. मनमोहन चं ते जीवनाला जहर म्हणणार गाणं आणि तिची ही मोगऱ्याची फुलं जिवंत आनंद देणारी, सुगंधी करणारी आणि हे गाणं एकल्यानंतरच फुलं देण्याचा तिचा हा नियम. असे समीकरण मनमोहन ला कसं जमल असेल ? कसे साधलं असेल ? आणि का करावेसे वाटलं असेल ? कदाचित हाच निसर्गाचा नियम असावा सुख, आनंद हे आपल्याला फक्त खो करून जातात, मग तो आनंद मुठीत आपणच टिकवायचा असतो. हा जगण्याचा अर्थ नसला तरी एक बाजू असावी हे निश्चित.

मनमोहन वेडी नाही असलीस तर हळवी आहे, शहाणी आहे. वेडी वाटणारी माणसं कधी किती शहाणपण आपल्यात जोपासून असतात नाही ! परत जीव फुंकावा एखाद्यया परीने यांच्या निर्जीव स्वप्नांमध्ये. या हळव्या पाखरांना त्यांचा कुठेतरी, कधीतरी हरवलेला ‘मोगरा’ परत मिळावा असे मनोमन वाटले.
ओंजळीतली फुलं सुकली, मातीत मिसळली …. पण ओंजळ मात्र सुगंधी करून गेली कायमची.

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी खेडीकर, बाल मानसतज्ञा, मुंबई.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कसं काय जमतं डॉक्टर तुम्हाला इतकं सुंदर लिहायला
    अगदी मनमोहन समोर उभी राहिली
    ग्रेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४