Thursday, December 25, 2025
Homeबातम्याहाफकिन हेरिटेज वॉक

हाफकिन हेरिटेज वॉक

मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे आज, २७ नोव्हेंबर पासून हेरिटेज वॉक सुरू केला आहे. हा वॉक प्रत्येक शनिवार व रविवार असेल.

या हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल. या टूरची तिकिटे bookmyshow.com वर बुक करता येतील, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच दिली. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त अभ्यासक आणि पर्यटन प्रेमी घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या उप्रकमा विषयी अधिक माहिती देताना पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन. पाटील यांनी सांगितले, “या हेरिटेज टूरचा उद्देश लोकांना विज्ञान आणि वास्तूकला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे हा आहे. येथे लोकांना संस्थेच्या वैभवाचे दर्शन घडविणारी व्हिटेज फोटो गॅलरी तसेच तत्कालीन गव्हर्नर यांचे निवासस्थान असलेल्या स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट इमारतीचे दर्शन घेता येईल. ह्या संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृति आहेत तसेच प्लेगची लस कशी विकसित झाली ह्याची प्रतिकृति देखील येथे पहायला मिळेल.”

हाफकिनचा परिचय
हाफकिन संस्था ही प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे
१८९९ साली स्थापन झालेल्या या संस्थेस प्लेगच्या लसीचा शोध लावणारे डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिन यांचे नाव देण्यात आले आहे.

सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यामध्ये अग्रेसर असलेली बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे.
ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते.

या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने प्लेगसाठी संदर्भ प्रयोगशाळा म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”