Monday, July 14, 2025
Homeसाहित्यहिरवळी

हिरवळी

सा क व्य व्हॉट्सॲप
समूहाच्या दुसऱ्या परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी संमेलनात कवयत्री स्मिता भीमनवार यांच्या कवितेचे
“कुटुंब रंगलंय काव्यात ” फेम प्रा विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण…

कविवर्य यशवंत आपल्या ‘ब्रह्मांड’ कवितेत म्हणतात…
“ब्रह्मांड तुला हे आहे आंदण दिधले |
त्वत् क्रीडेचे सुख-दुःख तुला ते सगळे ||”
परमेश्वराने मनुष्य प्राण्याला सुंदर निसर्ग बहाल केला आहे.
या निसर्गात माणूस जशी क्रीडा करेल तसे फळ त्याला मिळणार आहे. हे‌ माहिती असूनही माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी वृक्षतोड करून, सिमेंटची जंगले उभी करून, पर्यावरणाचा ऱ्हास करून निसर्गाचा समतोल बिघडवतो आहे. त्यामुळे पाऊस लहरीपणाने वागतो तर आहेच शिवाय पशू-पक्षांचे जीवनही उध्वस्त होते आहे. त्यासाठीच आता झाडे लावून ती जगवण्याचा, निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे, हेच “हिरवळी” या कवितेतून स्मिता भीमनवार यांनी सांगितले आहे.

झाडे सावली देतात, पशूपक्षांना आसरा देतात, सर्वांना फुले-फळे देतात, कांही झाडांपासून तर माणसाला औषधे बनवता येतात, झाडांची मुळे माती खचू देत नाहीत, सर्वांना प्राणवायूचा पुरवठा सुद्धा करतात. म्हणूनच निसर्गाचा समतोल आणि पर्यावरण राखण्यासाठी झाडे लावून जगवण्याचा आपण निर्धार करू या, हे‌च स्मिताजींना त्यांच्या कवितेतून सांगायचे आहे.

सिंगापूरला रहात असूनही मायबोली मराठीत स्मिता भीमनवार यांना‌ आपल्या भावना उत्कटतेने सांगताना पाहून मराठी काव्यरसिकांना आनंद झाल्याशिवाय रहात नाही.
– रसग्रहण : विसुभाऊ बापट. मुंबई

आता प्रत्यक्ष “हिरवळी” या कवितेचा आस्वाद घेऊ या……

निसर्गानं दिले अनमोल वरदान
पर्यावरणाचे आपण रक्षण करण्या
एक झाड लावू निसर्ग संवर्धना
विचारांचे करू प्रचार साकारण्या !!१!

झाडे सुंदर बहरलेली सृष्टी
प्राणी पशु पाखरे आनंदी
प्राणवायू ऑक्‍सिजन साठा वाढवी
पावसाने धरा होईल अंतरंगी !! २!!

वृक्ष देत असे सावली ची माया
फळे येतील गोमठी रसभरी
औषधोपयोगी झाडे रोग पळवी
जीव दया करून वन्यजीव रक्षणकरी !! ३!!

कडुलिंब तुळस शेवग्या दारोदारी
चला जपूया निसर्गाला परोपकारी
वसुंधरेचे सौंदर्या नव बहरावी
हरित क्रांती घडवून आणू सर्वासरी !! ४!!

आज निर्धार करू या मिळुनी सारे
एक तरी झाड आपण दारी लावू
मखमली धरा सौंदर्या दिसे खुलून
वृक्षा शीत पवन गीत आनंदाचे गाऊ !! ५!!

– रचना : स्मिता भीमनवार. सिंगापूर.

प्रत्यक्ष कवयत्री, स्मिता सुहास भीमनवार यांचे कविता सादरीकरण अनुभवू या..

https://youtu.be/VxDjbGUpS_Q

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा..

– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. निसर्गाचे ,पर्यावरणाचे जतन करण्यांचा बोध देनारी छान कविता .
    सुंदर धन्यवाद🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments