बनात केतकीच्पा नाग सळसळे
रानात हिरव्या उडती फुलपाखरे
नाचात नर्तकीच्या बोले घुंगरू
स्वप्नात नववधूचे मन बावरे
तरारले रान हिरवे हिरवेगार
फुलारले डोलारे झुपकेदार
शहारले होता दवस्पर्श हळूवार
पसरले कोवळे ऊन,हटे निहार
तुरे श्वेत-जांभळे तृणपात्यातले
पुरे-पुरे बाबांनो माना उंचावणे
गुरे वासरांचे रानोमाळ पाहे धावणे
स्फुरे गुराख्यास पावा वाजवणे
हिरव्या रानी बरसे मेघमाया
धरेच्या कानी वर्षाराणीचे गुज
झर्याची गाणी रुमझुम पैंजणी
पानोपानी पक्ष्यांची कुजबुज
— रचना : विजया केळकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रतिसादासाठी सर्वांचे धन्यवाद
मानवी भावभावना आणि निसर्गसौंदर्याचा सुरेख
शब्दाविष्कार !
मस्त
खुपच छान…
केतकीच्या बनी नाग सळसळले
अन् सखीचे काव्य खूपच आवडले
तरारले रान हिरवेगार
अन् दव स्पर्शाने मन झाले हळुवार
तुरे श्वेत जांभळे तृणपात्यातले
अन् धरतीचे देखता सौंदर्य मन सुखावले
हिरव्यारानी बरसे मेघमाया
अन् नभांगणी सप्तरंगी किमया.