Home बातम्या ‘हिलदारी’ला पुरस्कार

‘हिलदारी’ला पुरस्कार

0

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषेदेच्या नेस्ले प्रणीत हिलदारी अभियानाअंतर्गत महाबळेश्वर क्लस्टर ज्यात महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषेद, मेटगुताड, क्षेत्रमहाबळेश्वर, नाकिंदा, माचुतर येथील ग्रामपंचायती व वनविभाग या परिक्षेत्रात गेली अडीच वर्ष शाश्वत घन कचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबिण्यात येत आहे.

यात शहरातील विविध भागधारकांना कचरा वर्गीकरणाचे महत्व, शहर स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सफाई मित्रांना विविध प्रशिक्षण, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, विविध शासकीय योजनांतर्गत पात्र सफाई मित्रांची नोंदणी, त्यांना सुरक्षा साधनांचे वाटप तसेच येणाऱ्या पर्यटकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी विविध प्रकारातील माहिती फलक व उपक्रम यांचा तसेच शहरातील शासकीय, निमशासकीय व विविध असोसिएशन यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविणे व इतर उपक्रमांचा समावेश आहे.

या सर्व कामाची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर मार्फत घेऊन २०२३ चा उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कार हिलदारीस प्रदान करण्यात आला. शहरील हॉटेल पूनम येथील रोटरी क्लब च्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रमा दरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. श्रीधर ठाकूर, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल डॉ. सुनील धुमाळ, दिव्यांग उद्योजक डॉ. भावेश भाटीया, महाबळेश्वर रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षा स्वाती भांगडिया, नूतन सचिव दिनेश भिसे तसेच माजी अध्यक्ष श्री उमेश कोमटी या मान्यवरांच्या हस्ते हिलदारी टीम ला सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार देताना श्री शिरीष गांधी यांनी हिलदारी अभियानाअंतर्गत गेली अडीच वर्षात केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. हे अभियान सुरु झाल्यापासून शहरातील नागरिकांचा कचरा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व कचरा वर्गीकरण याबाबतची खूप सारी सकारात्मकता दिसून येते आहे. अनेक नागरिक सुद्धा या अभियानाचा भाग बनले आहेत व शहरात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची स्वच्छता टिकून दिसत आहे.

हा पुरस्कार हिलदारी अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. मुकेश कुळकर्णी यांच्यासह राम भोसले, निशांत कदम, खाकसरअली पटेल, अनुराग खरे व अमृता जाधव यांनी स्वीकारला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version