“बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर: ॥”
श्रीमद्भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, “गायन करण्यासाठी योग्य अशा श्रुतीं मध्ये मी बृहत साम या श्रुती मध्ये, सर्व छंदांमध्ये गायत्री छंदांमध्ये तर सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष मासात आहे आणि सगळ्या ऋतूंमध्ये वसंत ऋतु मध्ये आहे !”
कालिदासाने सुद्धा ज्याचं वर्णन ऋतुराज असं केलेला आहे अशा या वसंत ऋतूचे आगमन म्हणजे सृष्टीचा जणू गर्भार सोहळा ! निसर्ग जणू नवचैतन्याची शाल पांघरतो.
युरोपमध्ये एरवी सर्वजण थंडीचे वातावरण अनुभवत असतात त्यामुळे या वसंत ऋतूचे म्हणजेच अर्थातच स्प्रिंग सीझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. याच्या आगमनाचा काळ एप्रिल मधेच सुरू होतो. पण यंदा थंडी चा पाय काही निघता निघेना आणि, अखेरीस एकदाचे मे महिन्यात त्याने मी आल्याची वार्ता दिली, तो म्हणजे अर्थातच आपला वसंत ऋतू The Spring Season !
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
रितु बसंत, अपनो कंत गोरी गरवा लगाए
झुलना में बैठ आज पी के संग झूले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
गल-गल कुंज-कुंज, गुन-गुन भँवरों की गुंज
राग-रंग अंग-अंग, छेड़त रसिया अनंग
कोयल की पंचम सुन दुनिया दुख भूले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
मधुर-मधुर थोरी-थोरी, मीठी बतियों से गोरी
चित चुराए हँसत जाए, चोरी कर सिर झुकाए
शीश झुके, चंचल लट गालन को छू ले
केतकी, गुलाब, जूही, चम्पक बन फूले
बसंत बहार या सिनेमातले भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि ज्येष्ठ गायक मन्ना डे यांनी गायलेले हे गाणे आपसूकच ओठावर येते ! वसंत ऋतु मध्ये उमलणारी फुले आणि त्या भवताली पिंगा घालणारा भ्रमर याचे अगदी अचूक वर्णन केलेले आहे !
अशीच पंडित भीमसेन जोशी यांची अजून एक बंदिश राग बहार यातील द्रुत बंदिश
कलियन संग कर्ता रंग रलियां
कलियन संग कर्ता रंग रलियां
भंवर गुंजारे फूली फुलवारे
चहूं और मोर बोले
कोयल की ..कूक सुनी..हुक उठी
कलियन संग कर्ता रंग रलियां..
आजूबाजूच्या सर्व वृक्षांवर नवीनच फुटु लागलेली पालवी, आंब्याच्या मोहराचा वास, मधूनच फांदी करत वसंताच्या आगमनाची वर्दी देणारी कोकिळा असे आल्हाददायक वातावरण असते या ऋतूत भारतात !
या ऋतूत येणारे महत्त्वाचे सण म्हणजे वसंत पंचमी ! ज्ञान देवतेची सर्वकालीन अधिष्ठात्री असणार्या सरस्वती देवीचा जन्मच वसंत पंचमीचा ! भारतात विशेषतः बंगाल मध्ये वसंत पंचमीला सरस्वती पूजनाचे विशेष महत्त्व आहे !
यानंतर असणारा महत्त्वाचा सण म्हणजे होळी- रंगपंचमी ! जिथे निसर्गच विविध रंगांची लयलूट करत रोजच्या रोज जळून अधिकाधिक सुंदर चित्र रेखाटतोय, तिथे मानवाला हा सण साजरा करण्यासाठी अजून रंग घ्यावेसे वाटले तर काय नवल ? अर्थात नैसर्गिक रंगांनी खेळलेल्या रंगपंचमी बद्दल आपण बोलत आहोत !
युरोपमध्ये स्प्रिंग्ज सीझन मध्ये ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो अशा बहरणाऱ्या बागा म्हणजे ट्यूलिप गार्डनस् ! या ट्यूलिपच्या भरलेल्या बागा आपण विविध हिंदी सिनेमातून पाहिल्या आहेतच !
नेदरलँड अर्थातच ट्यूलिप साठी जगप्रसिद्ध आहे ! त्याबरोबरच चेरी ब्लॉसम, क्रॉकस, हायसेंथ, डॅफोडिल्स, लिली, फ्रिटालारिया, डेझी अतिशय सुंदर फुले आपल्याला आढळतात. या फुलांनी बहरलेल्या बागा आणि त्यांचा येणारा सुगंध मन मोहित करून टाकतो !
असा हा वसंत ऋतू, पानगळी नंतर येणारा ! कितीही संकट आली तरी पाय घट्ट रोवून उभे राहा, आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी मनातला वसंत म्हणजेच मनातलं चैतन्य कायम जपून ठेव, असेच जणू सांगतो.
तू तिथे मी या चित्रपटातील एक गीत, यानिमित्ताने आठवते,
शोधीत गाव आलो स्वप्नात पाहिलेले
किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले
दिसं मावळेल आता उजळेल चांदरात
जाता सरून रजनी येते नवी पहाट
चाले अखंड पुरती ऋतुचक्र हे अनंत
कधी ऊन झेलले अन कधी तृप्त चांदण्यात
साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत

– लेखन : धनश्री दिक्षीत. नेदरलँड्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +91 9869484800
वाह…! वसंत ऋतूचं उत्कृष्ट वर्णन आणि
जोडीला समर्पक काव्यरचना …!
खूपच छान…!
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था .
9921447007