Home बातम्या हृदय, मूत्रपिंड संरक्षणावरील आधुनिक उपचार : परिषद संपन्न

हृदय, मूत्रपिंड संरक्षणावरील आधुनिक उपचार : परिषद संपन्न

0

फाईन (Finerenone International Speaker Exchange) परिषद नुकतीच नागपूर येथे उत्साहात संपन्न झाली. या शैक्षणिक परिषदेत शहर व परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा मोठा सहभाग लाभला.

परिषदेचे प्रमुख आकर्षण फिनलंड देशातील हेलसिंकी विद्यापीठाचे इंटर्नल मेडिसिन विभागाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ प्रो. डॉ. पेर-हेनरिक ग्रूप यांचे मार्गदर्शन होते. त्यांनी “Finerenone: A Disease-Modifying Therapy for Heart & Kidney Protection” या विषयावर सखोल विवेचन करत जागतिक संशोधन, क्लिनिकल पुरावे आणि उपचार पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले.

नागपूर येथील खोबरागडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शंकर खोबरागडे यांनी “फिनेरिनोन वापराचा माझा अनुभव” या विषयावर प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभव मांडले.

स्वागतपर भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (बाहो) नागपूरचे अध्यक्ष डॉ. संजय रामटेके यांनी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रश्नोत्तर सत्रात उपस्थित डॉक्टरांनी तज्ज्ञांशी थेट संवाद साधत विविध शंकांचे निरसन करून घेतले.

परिषदेचे सूत्रसंचालन “बाहो”चे मानद सचिव डॉ. मोहन तांबे यांनी केले.

ही परिषद कमालीची यशस्वी झाली. आयोजकांनी सर्व वक्ते व सहभागींचे आभार मानले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version