नमस्कार, मंडळी.
आपल्याला माहिती असेल किंवा कदाचित नसेल, ४ जुलै हा माझा वाढदिवस. त्यात पुन्हा ६१ वा. म्हणजे तसा विशेषच महत्वाचा. पण कोरोना मुळे गमावलेले आप्तस्वकीय, मित्र, परिचित आणि लाखो अपरिचित यांच्या वियोगाने मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात कुटुंबियांनीही साथ दिली.
असं असलं तरी, सकाळपासूनच दूरध्वनी, मोबाईल, व्हाट्सएप, फेसबुकवर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्या सर्वांचे त्या त्या वेळी आभार मानण्याचा मी प्रयत्न ही केला.
पण काही व्यक्तींनी शुभेच्छा देण्यासाठी लेखच लिहिले. त्यांच्या परीने ते प्रसिद्धही केले. ते लेख, त्यांच्या भावना त्यांनी मलाही पाठविल्या.
पुणे समाजहितचिंतक श्री मदन लाठी यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले शिवाय नाशिक येथील त्यांच्या सूनबाईंच्या मदतीने शुभेच्छांसह सुंदरसा केक पाठविला तर श्री रावसाहेब मगर यांनी शरणपूर वृद्धाश्रमाला गोड जेवण दिले. या सर्व गोष्टींमुळे मी साहजिकच आनंदी तर झालोच पण अंतर्मुखही झालो.
आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो की, निवृत्तीनंतर जीवनात मोठी पोकळी निर्माण होते. पण यानिमित्ताने माझ्या लक्षात आले की, सेवेत असताना व नसताना सुध्दा ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन आपण समाजाच्या, इतरांच्या भल्याचा विचार केला, यथाशक्ती मदत केली तर त्यामुळे आपलंही जीवन आनंदी, कृतार्थ होते. म्हणून आत्मप्रौढी, आत्म प्रशांसेचा दोष पत्करून माझ्याविषयी व्यक्त झालेल्या भावना, लिहिल्या गेलेले लेख पुढे देत आहे.
समाजात सकारात्मकता वाढावी, हाच यामागील हेतू आहे. या सर्व लेखकांचे, शुभेच्छा देणाऱ्याचे मनःपूर्वक आभार.
आपला स्नेहांकीत
देवेंद्र भुजबळ
संपादक.
हॅप्पी बर्थडे, सर 💐
देवेंद्र भुजबळ सर हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात (dgipr) संचालक पदावर कार्यरत असतानाची गोष्ट. मी सरांनी लिहिलेले सावरकरांची पत्रकारिता पुस्तक वाचले. आमचे सर खूप चांगल्या रीतीने लिहितात. सर खूप चांगले संपादन करतात. हे इतर सर पण सांगत असत. मला देखील हे ठाऊक होते. त्याच बरोबर लोकांबद्दलची कामगिरी ते इतके सुरेख लिहितात की त्यात आपण मग्न होतो. पुढे वाचत राहावं असे वाटते. देवेंद्र भुजबळ सर आमच्या युवा पिढीला खूप मदत करत असतात. त्यांचं आमच्या युवा पिढीवर विशेष प्रेम व लक्ष असतं. ते आम्हाला गुरु प्रमाणे मार्गदर्शन करीत असतात. आम्हा सगळ्यांना लेख लिहिण्याकरिता मदत करीत असतात.
मी मंत्रालयात असताना ते कधी कोणावर रागवत नसत. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. आमच्या युवा पिढीला, लहान मुलांना ते मोठ्या मनानं काही चुकलं असेल तर क्षमा करत. मंत्रालयातल्या आमच्या युवा पिढीला पुढे ही जावे, नाव मिळवावे असे गुरु प्रमाणे त्यांना वाटत असे. सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमच्या सरांना आरोग्य, कीर्ती, यश, उदंड आयुष्य लाभो हीच देवाला प्राथर्ना.

– वर्षा वासुदेव भावसार
प्रांजळ अंतरंग
सस्नेह नमस्कार,
कांही माणसांचं अंतरंग इतकं प्रांजळ, इतकं निर्मळ असतं की ते माणसाचं आहे की देवाचं हेच कळत नाही…..
देवेंद्र भुजबळ सरांचं आमच्यासोबतचं वागणं आम्हाला नेहमी याच कोड्यात टाकतं. आमच्यासाठी ते देवमाणूस आहेत. त्यांचा विश्वास आणि त्यांचं पाठबळ हे सदैव आम्हाला जीवनाची नवी प्रेरणा देतं !! एक नवं बळ देतं !!! त्यांना ६१ वर्षे पूर्ण होत आहेत त्याचा मला व माझ्या परिवारास आनंदच वाटतो. सरांना सुख-शांती
आणि निरामय दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा !!!!वाढदिवसाच्या सदिच्छा.
आपला स्नेहांकित
– सुरेश गोपाळे, दहिसर.
ऊर्जेचा स्रोत
भरारी प्रकाशनचे लेखक देवेंद्र भुजबळ सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर कृपेने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या निमित्ताने भुजबळ सरांचा थोडक्यात परिचय..
श्री देवेंद्र भुजबळ हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागातून ‘माहिती संचालक‘ म्हणून निवृत्त झाले आहेत. या विभागात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी, कोकण, नासिक, वृत्त विभागाचे उपसंचालक म्हणूनही काम पाहिले आहे.
माहिती विभागात येण्यापूर्वी ते ‘मुंबई दूरदर्शन केंद्रात जवळपास सहा वर्षे कार्यक्रम निर्मिती करीत होते.’
तत्पूर्वी ते काही काळ ‘पत्रकार’ होते. आपलं दैनंदिन कामकाज संभाळुन श्री भुजबळ यांनी अनेक विषयांवर लेख लिहिलेले आहेत. विविध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.
भरारी प्रकाशच्या वतीने ‘गगन भरारी’, ‘प्रेरणेचे प्रवासी’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गगन भरारीचे अनुवादित हिंदी पुस्तक “उडान”, यशस्वी व्यक्तींच्या यश कथा, ही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. याव्यतिरिक्त भुजबळ सरांनी लिहिलेली “भावलेली व्यक्तीमत्व”, “करिअरच्या नव्या दिशा” ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
आजवर भुजबळ सरांनी विविध ठिकाणी विविध विषयांवर व्याखाने देऊन प्रबोधन केले आहे.
अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या एवढ्या व्यस्त कामकाजात देखील त्यांनी आपली समाजकार्याची आवड जोपासली आहे. एखाद्या सेवाभावी संस्थेला मदत मिळवून देण्यासाठी धडपड असो अथवा समाजातील तरूण नव व्यवसायीकांची समाजाला ओळख करून देणे असो, सगळे समाजकार्य ते उत्साहाने करतात.
आयुष्यभर अनेक चढ उतार पार करत आपला वेगळा ठसा उमटवून त्यांनी मान सन्मानाची पदे भूषविली आहेत. सकारात्मक ऊर्जेने व्यापलेला माणूसच अशा विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी पार पाडू शकतो.
परत एकदा भुजबळ सरांना आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा..
– लता गुठे, साहित्यिका, प्रकाशिका, संपादिका. मुंबई.
माझे गुरु, माझे आधारस्तंभ
श्री देवेंद्र भुजबळ सरांचा आणि माझा संपर्क मागच्या वर्षांपासूनच आला. त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि आमची ओळख झाली. त्यांनी माझ्या कलेचा अभ्यास करून साधारणतः आठ दिवसांनी मला फोन केला.
वास्तविक नाते नसतानासुद्धा जी माणसं आवर्जून फोन करतात ते महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. तसेच त्यांनी केले. आणि माझ्या आगळ्यावेगळ्या छंदाचा, आयुष्याचा प्रवास कसा झाला, काय अडचणी आल्या, कसा प्रतिसाद मिळाला याविषयी आढावा घेऊन त्यांनी तो जनतेपर्यंत पोहोचवला. हे त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे इतरांनाही आपली कला दाखवण्याची प्रेरणा मिळते.
इतरांच्यात असलेली कला व त्या कलेत आलेला अनुभव किंवा त्या कलेचा प्रवास याचे वर्णन माझ्या सारख्या कडून घेऊन ती जनतेपर्यंत अथवा वाचकांपर्यंत पोचवण्याचं मोलाचं कार्य महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांनी करून एक नवीन व्यासपीठ उभे
करून केले आहे. ते व्यासपीठ म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील
https://newsstorytoday.com/
न्युजस्टोरीटुडे हे वेबपोर्टल होय.
या पोर्टल मार्फत ते देशविदेशचे विविध प्रकारचे लोकोपयोगी विचार, कल्पना, अनुभव, उपक्रम जनतेपर्यंत पोचवतात. दुसऱ्यांच्या आतील कला जगाला दाखवण्याचा आणि समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी योगदान देण्याचा ते प्रयत्न करत आहे.
श्री देवेंद्र भुजबळ यांच्या आयुष्याचा प्रवास बघितला तर फारच खडतर आहे. माझ्यापेक्षाही खरं तर. परंतु ते न डगमगता आणि विशेष म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन नसतानाही, परिस्थितीला सामोरे जाऊन, आलेल्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले यशस्वी जीवन करून दाखवले आहे. ते लहान असतानाच त्यांच्या परिवाराचे छत्र परमेश्वराने हिरावून घेतले. त्यामुळे पडेल ते काम करत ते शिकले. मोठे अधिकारी झाले.त्यांच्या आयुष्याचा प्रवास आजच्या पिढीला आदर्श आणि प्रेरणादायक ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
लोकांचे मनोधैर्य कायम राहण्यासाठी, वाढण्यासाठी त्यांनी स्वतः विविध माध्यमातून प्रयत्न केले तसेच इतरांनाही लेखनासाठी प्रेरित केले.
आयुष्यात प्रत्येक जण शिक्षणात यशस्वी होतोच असं नाही. २० टक्के लोकं शिक्षणात यशस्वी होतात. प्रत्येकाजवळ परमेश्वराने कला दिलेली आहे. फक्त त्याचे आपण आत्म परीक्षण करत नाही. ते आत्म परीक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे मोलाचे कार्य देवेंद्र भुजबळ सर करीत असतात. त्यामुळे आपल्याला आपले आयुष्य आनंदाने आणि सुखाने जगता येते.
“कुठलेही अपयश हे कायमस्वरुपी नसते. आपल्या जिद्दीच्या जोरावर आपण अपयश आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो, त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींनी निराश न होता, नाउमेद न होता, आजूबाजूंच्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, आपण आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे, आणि त्यातच आपल्या जीवनाचे व यशस्वीतेचे सार आहे.” असे ते नेहमी म्हणतात.
श्री भुजबळ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

– मदन लाठी, न्यू सांगवी, पुणे.
गुरू दक्षिणा
गुरू शिष्य हे जगातील सर्वात पवित्र, अनमोल, निरागस व कोणतीही अपेक्षा नसलेले अगदी प्रामाणिक असे नाते आहे. ह्या नात्यात गुरू आपल्या शिष्य शिष्यामधील गुण अथवा अवगुण ओळखून त्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देऊन त्याला घडवतात.
गुरूंचे ऋण आपण आजन्म फेडू शकत नाही. म्हणून तर गुरूंचे आचार व विचार आत्मसात करून त्या दिशेने आयुष्यभर वाटचाल केली पाहिजे हीच आपल्या गुरूंना एक गुरुदक्षिणा म्हणून अर्पण करू शकतो.
आज आमच्या गुरू शिष्य ह्या नात्याला वर्ष पूर्ण झाले. आमच्या शेजारी राहणाऱ्या आशाताई व कुंदप काकांच्या मुळे माननीय देवेंद्र भुजबळ सरांची ओळख झाली. त्या वेळी भुजबळ सर व अलका ताई आमच्याही घरी आले होते. मनमोकळ्या गप्पा झाल्या. जणू त्यांची अनेक वर्षांपासून ओळख होती. अलका ताईंचा बोलका स्वभाव खूप भावला. दोघेही एवढे प्रतिष्ठित, प्रसिद्ध व्यक्तिमत्व असले तरी त्यांच्या बोलण्यातील नम्रपणा आपलेपणाची जाणीव करून देत होता.
पुढे काही महिन्यांनी लोकडाऊन झाले. सगळीकडे कोरोनाने कहर केला. सगळ्या गोष्टी थांबल्या. मी अनेक वर्षे घरीच शिकवणी वर्ग घेत होते. त्यामुळे क्लास व घरातील जबाबदारी एवढेच माझे विश्व होते. पूर्ण वेळ कामात जात होता. ह्या आधी लिहीत होते पण जेमतेम महिन्यातून एक लेख जो औरंगाबाद येथील समाज उन्नती मासिकात येत होता.
लॉकडॉउनमुळे निरर्थक घरात बसून वेळ खूप वाया जाऊ लागला. एवढा वेळ काय करावे हा पडलेला प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. कारण ह्या आधी एवढी रिकामी मी कधीच नव्हते. टीव्ही तरी किती वेळ पाहणार आणि वाचन तरी किती करणार ? बसून कंटाळा येत होता.
मग मी पहिला लेख लिहून भुजबळ सरांना फॉरवर्ड केला. त्यांनी तो दुरुस्त केला व त्यांच्या फेसबुक वर ठेवला. मला तर हे सर्व नवीन होते. सुरवातीला नीट टायपिंग ही जमत नव्हते. मग मुलांनी शिकवले. नंतर सरांनी सुचविल्याप्रमाणे स्वतःचे फेसबुक अकाउंट उघडले. ते ही कुंदप काकांनी उघडले.
कोणती काळजी घ्यावी ह्याची सूचना भुजबळ सर देत होते. हळूहळू सर्व गोष्टी शिकत होते. नंतर स्वतःच्या फेसबुकवर व व्हाट्सएपअँप द्वारे लेख प्रकाशित करू लागले.
पुढे लेख वृत्तपत्रात प्रकाशित होऊ लागले. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढत गेला. मी ही लिहू शकते हे केवळ माझ्या गुरूंच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनमुळे व वेळोवेळी दिलेल्या सुचनांमुळे होऊ शकले. मला देवेंद्र भुजबळ सरांच्या रूपाने साहित्यिक गुरू लाभले. रोज लिहिले पाहिजे, वाचन केले पाहिजे, लिखाणात कशा प्रकारे सुधारणा केली पाहिजे हे मला ते सांगत असत. ते अतिशय शिस्तप्रिय असल्याने माझ्या लिखाणात सुधारणा होत गेली.
इतकी प्रतिष्ठित, हुशार, प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून देखील माणूसकी कशी जपावी, नेहमी नम्रपणे बोलावे व आपले काम नेहमी चोख असावे हे गुण मी त्यांच्या कडून शिकले. वेळात वेळ काढून त्यांनी त्यांच्या ह्या शिष्याला घडवले. त्यामुळे त्यांची मी अत्यंत आभारी आहे. माझ्या वेळेचा सदुपयोग झाला व एक लेखिका म्हणून नवीन ओळख निर्माण झाली ते केवळ माझ्या गुरूंमुळे.
नवीन सुरवात करायला वयाचे कोणतेही बंधन नसते त्यामुळे आज ४५ व्या वर्षी माझ्या लेखणीला नव्याने सुरवात झाली यावर कधीकधी माझाही विश्वास बसत नाही. अशक्य ही शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा गुरूंची साथ असते. आज लिखाण माझा श्वास आहे ज्यामुळे मला आत्मिक समाधान व आनंद मिळतो.
भुजबळ सर अतिशय जिद्दी, शिस्तबद्ध, कष्ठाळू, प्रामाणिक, ऊत्तम लेखक, उत्तम वक्ते, सर्वांना सहकार्य करणारे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आहे. मला त्यांच्यासारखे गुरू लाभले हे माझे भाग्य आहे.
आज त्यांचे स्वतःचे वेबपोर्टल हे देश विदेशात लोकप्रिय व प्रसिद्ध आहे. त्यासाठी ते दिवसभर कामात असतात. खूप मेहनत घेतात. अलकाताई ह्या जणू त्यांचा उजवा हात आहे ज्या सहसंपादकाचे काम करतात. त्या दोघांनाही ह्या वयात काम करताना पाहून असे वाटत नाही की ते दोघेही रिटायर्ड आहे. अशा नावाजलेल्या वेबपोर्टल वर माझे लेख व कविता प्रकाशित होतात हीच अतिशय अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. हा माझा गृहिणी पासून लेखिकेचा प्रवास सुखकर झाला तो केवळ माझ्या गुरूंमुळे. मी रोज नवनवीन गोष्टी शिकल्या व अजूनही शिकत आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहे ज्या साठी हा जन्म देखील अपुरा आहे.
४ जुलै माझ्या गुरूंचा म्हणजे आदरणीय देवेंद्र भुजबळ सरांचा वाढदिवस. ह्या निमित्ताने हा लेख माझ्या गुरू चरणी अर्पण करते व त्यांना आनंदी, आरोग्यदायी व उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते🙏

लेखन : रश्मी हेडे.
देवेंद्र भुजबळ : जीवन प्रवास
माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांचा ४ जुलै या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वेधक, प्रेरक जीवन प्रवास जाणून घेणे आजच्या तरुणांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिक दृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी म्हणून गेली ३५ वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय होते.
दूरदर्शनच्या गाजलेल्या महाचर्चा कार्यक्रमाचे ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन तर आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे टीमलीडर होते.
महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी ‘करिअरनामा’ हे सदर त्यांनी सुरू केले. या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत. त्यांचे हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होत असत. पुढे त्याचेच फलित म्हणजे २५० सरकारी अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांची माहिती असलेले “करिअरच्या नव्या दिशा” हे त्यांचे पुस्तक होय. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या मुली, महिलांवर त्यांनी लिहिलेल्या प्रेरणादायी कथा ‘गगनभरारी’ या त्यांच्या पुस्तकात तर युवा आणि पुरुषांच्या प्रेरणादायी कथा ‘प्रेरणेचे प्रवासी’ या पुस्तकात समाविष्ट आहेत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. पुढे याच नावाने त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित झाले.
मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते.
विविध विषयांवर ते सातत्याने लिहीत असतात. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता” हा त्यांचा संशोधन पर लेख मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक नाट्य, चित्रपट, दूरदर्शन, प्रसार माध्यमे यात कार्यरत राहण्यासाठी देवेंद्र भुजबळ सतत प्रयत्नशील असतात.
समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठीही ते काम करत असतात.
थोर व्यक्तींच्या जीवनांवर आधारित अभिमानाची लेणी हे त्यांचं ई पुस्तक लॉकडाऊनच्या गेल्या वर्षी ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. शाहू महाराजांचे कार्य असो, तुकडोजी महाराज यांची कामगिरी असो, जांभेकरांची पत्रकारिता असो, रवींद्रनाथांची साहित्याची भरारी असो, महात्मा फुले यांची जनसेवा असो, विनोबा भावे यांची लोकोपयोगी कामे असो, अण्णाभाऊ साठे यांच्या उत्तुंग प्रतिभेचा आविष्कार असो, उत्तम तुपे असो, वि. स. पागे यांचे काम असो प्रत्येकाच्या कार्याची देवेंद्र भुजबळ यांनी उत्तम मांडणी केली आहे.वाचकांसाठी हे ई पुस्तक. http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/abhimanachi_leni_devendra_bhujbal.pdf या लिंकवर विनामूल्य उपलब्ध आहे.
देवेंद्र भुजबळ सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देवेंद्र भुजबळ, :+91 9869484800 /
devendrabhujbal4760@gmail.com

– संजीव_वेलणकर, पुणे.
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
वर्षा मॅडम व आरोटे सर,आपण दोघानीही माझ्याविषयी व्यक्त केलेल्या भावनांमुळे मी खूप भारावून गेलो. आपल्या सुंदर लेखनाच्या माध्यमातून ,उशीरा का होईना, आई ओळकब झाली हे माझे भाग्यच होय. आपण दोघेही खूप छान लिहीत असता.ते कायम ठेवा. आपला लोभ आहेच, तो वृद्धिंगत होत रहावा,हीच प्रभू चरणी प्रार्थना.
सन्माननीय श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब प्रथम आपणास 61 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
आपल्या जीवन प्रवासात आपण पत्रकारीता , दूरदर्शन, महाराष्ट्र शासन सेवेत माहिती संचालक पदा पर्यंत यशस्वी घोडदौड केली.
आपण उत्तम लेखक, उत्तम वक्ते, उत्तम मार्गदर्शक असून उत्तम माणूस म्हणून जनसेवा केलीत त्या बद्दल आपले हार्दिक आभार 🙏
आपणास सुदृढ निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना 🙏🌹
४जुलै हा दिन भुजबळ सरांचा जन्मदिवस. अमेरिका स्वतंत्र दिन सुद्धा हाच दिवस आहे. भुजबळ सरांचे व्यक्तिमत्व स्वातंत्र्य रुपी आहे. जरी मी व अलका कार्यालयात काम करणाऱ्या जुन्या व चांगल्या मैत्रिणी असलो तरी सरांचा परिचय नव्हता. हे माझे दुर्दैव! vrs नंतर मोकळ्या वेळेत आम्ही भीशी निमित्त भेटत होतो, तेव्हा मी सरांचे आयुष्य प्रवास ऐकत आले. मला लिखाणाचे वेड पहिल्या पासून होतेच. शिवाय वयाच्या उतरणीवर आपला जीवन प्रवास मांडावा,अशी सुप्त इच्छा मनात होती. कोरोना दरम्यान मी असेच लेख लिहून आमच्या ग्रुपवर पाठवले. कल्पनाच नव्हती!आणि मला अलकाचा फोन आला, “तुझा छानसा फोटो पाठव, भीत्या पोटी ब्रह्मराक्षस, हा लेख आमच्या वेबपोर्टल टाकणार आहे.” मी तर वेडीच झाले. प्रथमच मिळालेले कौतुक, माझ्या साठी खूप भारी होते. संपादक श्री. भुजबळ सरांच्या नजरे खालून माझे लेखन गेले, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे. इच्छा पूर्ती लेख व कविता विदेशापर्यंत नेण्याचे कार्य, तुमच्या सारख्या गौरवशाली व्यक्तीकडून होण्याचे भाग्य माझा “जीवन प्रवास” ह्याही भागांना लाभत आहे. मला लाभलेले आदर्श गुरु! हे शिष्याला मिळालेले, आयुष्याच्या नव्या वळणावरील उद्योगीपणाचे सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत आहे.हया दिनानिमित्त सर, तुमच्या समाज कार्य तळमळीस मानाचा सलाम!🙋लेखनाची साखळ दौड अशीच घट्ट होत जावो. सर, तुम्हाला सुदृढ आरोग्य, सुख समाधान व उदंड आयुष्य लाभो! हीच माझ्या सर्व कुटुंबीयांकडून ईश्वर चरणी प्रार्थना!
Excellent
Happy Birthday Sir
Regards
Prachii Sorte Jagtap
Associate Editor
MahaNews