आला पाऊस..पाऊस..
हे आकाश शुभ्र झाले !!धृ!!
कृष्णवर्णी मेघ
नभीमंडपी रंगले
धरतीस कवेत घेऊनी
थेंब टपोरे गेले !!१!!
डोंगरावरुनी झरे
झर-झर उतरले
हिरव्या-हिरव्या रानी
गायी-गुरे रमले !!२!!
पिलांस दाणे भरविण्या
ओले पंख थरथरले
निळ्या नभी उंच
खग घरट्यातूनी उडाले !!३!!
हे आकाश शुभ्र झाले
हे आकाश शुभ्र झाले
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/05/IMG_20210521_214543-150x150.jpg)
– रचना : सुरेखा गावंडे.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सौ सुरेखा गावडे यांची कविता आवडली 👌👌👍👍
🌹सुंदर कविता 🌹