इंग्लंड निवासी सौ लीना फाटक यांना
गणेश चतुर्थीनिमित्त काल रात्री सुचलेली सुंदर शब्द रचना.
एक बाळ छान
गोरं गोमटं
सर्वांनाच त्याचं
फार कौतुक असतं
कोणी त्याला
घालतं न्हाऊ-माखु
नवीन हेअरस्टाईलनी
म्हणे त्याला नटवू
चढवती त्याला
नवीन कपड्यांचा साज
मॅचिंग शुज- मोजे
अन् परफ्यूमचा वास
मिरवती सगळीकडे
त्याला कडेवर घेऊन
रस्त्यांतले लोकं बघती
माना वळवून वळवून
सगळ्यांनाच वाटतो
तो हवाहवासा
आई टाहो फोडी
“तो माझ्या मळाचा”
भक्तांना येई त्याच्या
मायेचा पूर
आई-लेकरांतला
जिव्हाळा कधी नसे दूर
कसा रे देवा गणेशा,
तुझा समाज न् हा काळ
हिरे-माणकांखेरीज नाही
अस्सल सोन्याला भांव
कुचंबणा होई देवा
माझ्यासारख्यांची
ना आवड ना एैपत
माझी हिऱ्यामाणकांची
चिरंतन राहो तुझे स्थान
मन-मंदिरी
बाव्वनकशी मुर्ती तुझी
भक्तिही माझी साजिरी

– रचना : सौ. लीना फाटक, वॉरिंगटन, इंग्लंड.