घरामध्ये राहूनच करते नमस्कार
आता घडवून आण तूच चमत्कार
सांभाळू आम्ही रितीरीवाज अन संस्कृती
पण हा जीवघेणा आजार दूर कर
कोरोनाचे संकट नष्ट कर
पैसा प्रॉपर्टी गरीब श्रीमंत जात धर्म
सगळचं ठरले व्यर्थ
कळाले जीवनाचे अर्थ नि आयुष्याचे मर्म
पण आता हे दृष्टचक्र बंद कर
कोरोनाचे संकट नष्ट कर
वाटते आहे काळजी भीती
सर्वत्र पसरली आहे भयानक शांती
बंद आहेत भेटी नि दूर ती नाती
लढत आहेत त्यांच्यावर करुणा कर
कोरोनाचे संकट नष्ट कर
उद्या जन्माला येणाऱ्या बाळाला
श्वास घेताना नि अनोळखी स्पर्श होताना
कोणाकडे संशयित पाहण्याची वेळ आणू नको
एका आईसाठी एवढं कर
कोरोनाचे संकट नष्ट कर
बाप्पा परत तुला वाजत गाजत आणायचे आहे
तुझ्या समोर लेकरांना नाचायचे आहे
पुढच्या वर्षी येण्याआधीच हे सावट दूर कर
कोरोनाचे संकटं नष्ट कर 🙏
– रचना : वर्षा खेसे-जगताप