ह्या उतावळ्या मनाला
काही कळतच नाही.
प्रत्येक वयाबरोबर कसं..?
हे मन शरीरात राहायला
स्मरतच नाही.
विशीची तिशीच्या चैतन्यासारखे
हे मन वेगे वेगे धावतं
शरीराला सतत प्रेरणेने
पुढे पुढे करतं.
चाळीशी पन्नाशीला विश्वासानी
हे मन ‘मी परिपूर्ण’ ‘मी परिपूर्ण’ म्हणतं
प्रत्येक पेशीला गालात हसून
‘चूबंकिय’ तत्वात जोडतं.
ह्या मनाने आरोग्याची किल्ली
ब्रह्मानंदाच्या हातून घेतली काय..
हे शरीर स्पंदा स्पंदाने
फुलून खुलू लागलं.
आता ‘यौवना’ने भरलेले हे शरीर
‘मी तरुण’ ‘मी तरूण’ स्वतःला
‘शुद्ध’ मनाने जोडू लागंल.
आता हे उतावळ मन
‘स्वाभाविक’पणे
‘मी ठणठणीत’ म्हणत
अंतचक्षूनी स्वतःला पाहू लागलं.
आणि आता हे समाधानी मन
‘ऊत्साही’ संतोषाने शरीरात
‘योग्य’ स्वर्गीय आनंदात
नांदू लागलं, रमू लागलं
राहू लागलं, ध्यान करू लागलं

— रचना : सौ.पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800