Thursday, September 18, 2025
Homeबातम्याहॉकी टूर्नामेंट

हॉकी टूर्नामेंट

डेक्कन हैदराबादचा भोपाल इलेवन संघाविरुद्ध हल्लाबोल ‘9 वि 1’ ने मोठा विजय !

जालंधरच्या रजनीश कुमारचे मुंबई विरुद्ध चार गोल !नांदेड येथे सुरु असलेल्या 48 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या दुसऱ्या दिवशी खेळण्यात आलेल्या साखळी सामन्यात डेक्कन हैदराबाद आणि कॉर्प्स ऑफ सिग्नल जालंधर संघानी दिवस गाजवला.

डेक्कन हैदराबाद ने भोपाल इलेवन संघास 9 विरुद्ध 1 गोल फरकाने सामना जिंकून आज हॉकी रसिकांच्या डोळ्याची पारणे फेडली असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. तर इतर सामन्यात कॉर्प्स ऑफ सिग्नल जालंधर, इएमइ जालंधर, इटारसी संघानी त्यांचे सामने सहज जिंकले. अमरावती आणि करनाल हरियाणा संघातील सामना 2 विरुद्ध 2 बरोबरीत सुटला. 

मंगळवार दि. 4 जानेवारी रोजी पहिला सामना इएमइ जालंधर विरुद्ध एक्सेलेंसी अकादमी पुणे संघा दरम्यान खेळला गेला. इ. एम. इ. जालंधर संघाने 2 विरुद्ध 1 गोल अंतराने हा सामना जिंकला. खेळाच्या सुरुवातीस 6 व्या मिनिटाला जालंधर संघास मिळालेल्या पेनल्टी कार्नरचे गुरजिंदरसिंघ याने गोलात परिवर्तित केले आणि आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही संघात संघर्षपूर्ण खेळ झाला. पुणे संघाने 45 व्या मिनिटाला मिळालेल्या एका पेनल्टी कार्नरचे रूपांतरण गोल मध्ये करून बरोबरी साधली. आदित्य रसाला याने गोल केला. पण जालंधर संघाने 54 व्या मिनिटाला एक मैदानी गोल करत पुन्हा आघाडी घेतली. नंतर हा सामना जालंधरने जिंकला.

कालचा दूसरा सामना इटारसी हॉकी क्लब वि. हॉकी औरंगाबाद संघा दरम्यान झाला. हा सामना इटारसी संघाने 3 वि. 1 असा जिंकला. खेळाच्या सुरुवातीलाच 4 व्या मिनिटाला औरंगाबादच्या कलीम ने मैदानी गोल करून आघाडी मिळवली होती. पण इटारसी संघाने पलटवार करत 5 व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. इटारसी संघातर्फे मोहम्मद जैद खान याने 5 व्या व 17 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. नंतर सौन गडवील याने 48 व्या मिनिटाला गोल करत संघाची पकड सामन्यावर घट केली.

तिसरा सामना कॉर्प्स ऑफ सिग्नल जालंधर विरुद्ध रिपब्लिकन मुंबई संघात झाला. सीओएस जालंधर संघाने रजनीशकुमारच्या बहारदार खेळाच्या मदतीने हा सामना 5 वि. 2 गोल अंतराने खिश्यात घातला. रजनीशकुमारने एकाच सामन्यात 4 गोल करत दिवस गाजवला. जालंधर संघाने खेळाच्या 2 व्या मिनिटलाच गोल करत खेळात उत्साह निर्माण केला. रजनीश कुमार याने संघासाठी पहिला गोल केला. त्याच्या उत्तरात मुंबई संघाने तिसऱ्या मिनिटाला गोल केला. हा गोल संतोषसिंघ याने केला. त्यानंतर जालंधर तर्फे रजनीश कुमारने 13 व्या व 28 व्या मिनिटाला गोल करत संघास मोठा आधार दिला. मुंबईच्या रेमथ मामनिया ने 45 व्या मिनिटाला एक गोल करत अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण जालंधरच्या सुखराम कैथा ने 58 व्या आणि रजनीशकुमार ने 59 व्या मिनिटाला गोल करून मुंबईसाठी मोठी निराशा लादली.

चौथा सामना भोपाल इलेवन वि. डेक्कन हैदराबाद संघा दरम्यान झाला. एक तरफा झालेल्या सामान्यात डेक्कन हैदराबाद संघाने 9 विरुद्ध 1 गोल अंतराने भोपाल संघाचा धुवा उडवून दिला. भोपाल संघाच्या शाहबाजोद्दीन 17 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवली. पण हैदराबाद संघाने लागोपाठ हल्ले चढवत नऊ गोल केले. 18 व्या मिनिटाला शिवा याने पेनल्टी कार्नर मध्ये गोल केला. नंतर एन. संतोष याने 2, ए. वी. श्री याने 2 गोल केले. तर फेरोजबीन फरहत, शेख अबुल मोहज, बी. धर्मवीर आणि बी. रामकृष्णा यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पाचवा सामना मुंबई कस्टम, मुंबई आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट संघात झाला. या सामन्यात मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाने एक विरुद्ध शून्य (1 vs 0) गोल अंतराने सामना जिंकला. खेळाच्या 47 व्या मिनिटाला अमीदखान पठान याने केलेल्या गोलाच्या आधारावर पोर्ट ट्रस्ट संघाने सामना राखला.

सहावा सामना एस. एस. क्लब अमरावती आणि एच. पी. सी. एल. करनाल हरियाणा संघा दरम्यान झाला. दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. हरियाणा संघाने 2 विरुद्ध 1 आघाडीने चांगला खेळ केला पण शेवटच्या काही सेकंदात मिळालेल्या एका पेनल्टी कार्नरचे रूपांतरण गोलात करत अमरावती संघाने वरील सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले.

हॉकी कमेटीचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब यांनी सर्व संघांच्या संघ व्यवस्थापक आणि खेळाडूंचे आभार मानले. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येत प्रेक्षकांची उपस्थिती होती.

– लेखन : रविंद्रसिंघ मोदी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा