नुकताच कुठे नाकावरचा मास्क हटला होता
ओमिक्रॉनच्या लाटेनं जीव गलबलून गेला
लॉकडाउनच्या दिवसात जगणं महाग झालं
कोरोनाच्या महामारीत मरण स्वस्त झालं
कोजागिरी चांदण्याला अवसेचं ग्रहण लागलं
स्वच्छ नितळ पाण्याला मातीनं गढूळ केलं
घंटा झाल्या टाळ्याही झाल्या
सारे नाद गगनी जाता आशाही विझल्या
वाफेजलेल्या नाकांनाही झिणझिण्या होत्या
साधी शिंक आली तरी शंका चुकचुकत होत्या
श्वास मोकळा आता घेऊ लागलो होतो
पुन्हां निर्बंध लागू होतील भयाने ग्रासलो होतो
ओमिक्रॉन आहेच का ? की मनसुबा
टीव्ही वाल्यांचा नाक आपले ठेचण्या ?
हेतू असे विदेशी कंपन्यांचा !
वाळूवरती मारलेल्या रेघोट्या पुसून जातात
अस्मानी संकटात काळजावर वार होतात
मानव दीन झाला मनांत
जळतात ज्वाळा, टाळूवरचं लोणी
चाखण्या कितिकांचा असतो डोळा !

– रचना : सुनील शरद चिटणीस
खरोखर जगणं कठीण होऊन बसलंय नि मरण मात्र स्वस्त झालंय.