Sunday, July 6, 2025
Homeसाहित्य२०२१ नं काय शिकवलं ?

२०२१ नं काय शिकवलं ?

२०२१ नं काय शिकवल ?

नात्याची विण घट्ट करायला
आहे तो क्षण समरसून जगायला
थोड थांबून अंतरात डोकवायला
उरातली आशा जीवंत ठेवायला

२०२१ नं काय शिकवलं ?

घराचं घरपण निरखायला
परदुःखात सोबती व्हायला
मानवतेची कास धरायला
आतला माणूस जपायला

२०२१ नं काय शिकवलं ?

सहृदयतेनं पहायला
क्वचित् माफ करायला
तुटली नाती सांधायला
सुखाची व्याख्या बदलायला

२०२१ नं काय शिकवल ?

प्रार्थनेचं बळ आजमावायला
धडपडलो तरी सावरायला
जाणारा गेला तरी पुढे जायला
माणसातला परमेश्वर पहायला.

वर्ष सरत आहे घेऊन उद्याची आशा
जगणे सुंदर आहे सोड ही निराशा

शिल्पा कुलकर्णी

– रचना : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. वास्तवता, चपखल शब्द न सकारात्मक विचारांचा सुरेख संगम. 👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments