Home साहित्य 🌹अनोळखी🌹

🌹अनोळखी🌹

0

तुला ना कळले मला ना कळले
अवचीत सारे कसे हे घडले ||

तू मनस्वी, अंतरीच रमला
मी स्वछंदी, बाहेरीच गुंतले ||

तू ना कधी, मनीचे दार उघडले
मी ना कधी, अंतरी डोकाविले ll

तुझ्या खुणांनी मी बहरले
अविरत भाळी, तुला सजवायचे ll

मी तर होते स्वप्न पाहिले
तू तर माझे चित्रच पुसले ||

ओळखीचे तर आपण होतो
अनोळखीचे कसे हे घडले ?||

तुला ना कळले मला ना कळले
तू ना कधीं मला पाहिलें ll

मी ना कधी तुला वाचलें
तुला ना कळले, मला ना कळले ll

तू ना कधी मज सांगितले
मी ना कधी तुझं ऐकिले ll

अंदाज आपुले कसे हे जुळले
अवचीत सारे कसे हे घडले ll

आशा दळवी

– आशा दळवी. दुधेबावी, फलटण.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version