Home साहित्य 🔥तप्त उन्हाळा 🌞

🔥तप्त उन्हाळा 🌞

1

रणरणत्या उन्हाच्या तप्त ज्वाला
उष्णकाहिलीत होरपळती तनाला
आभास वाटे मृगजळाचा जीवाला
तन्मनाने पहुडावे वटवृक्ष छायेला🔥🌞🌳

लांबलांब सडका तापून तडकल्या
तन्मनी आगडोंब ज्वाला भडकल्या
कष्टणार्या तनूते घर्मधारा झिरपल्या
निसर्गलीला कशी घुमवे आपल्याला🌞🔥

रानीवनी अंगारज्वाला विखुरलेल्या
पक्षी प्राणी तहानेने व्याकुळलेला
जलाविना विहिरी ओस पहुडलेल्या
रखरखीत उन्हाळा तापवे सृष्टीला🌞🌳🥀

तडफड सजीवांची, करीतो उन्हाळा
वृक्षवल्लरींनाही लागती तप्तझळा
फळाफुलांनाही नाही येत उमाळा
चातकासमप्रतीक्षाकधी पावसाळा🌞🔥

स्वप्नगधां आंबेतकर

– रचना : स्वप्नगंधा आंबेतकर. विरार

1 COMMENT

  1. आपली ही कविता खूप छान, आशयघन आहे
    शेवटही सकारात्मक.
    आवडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version