नमस्कार मंडळी,
आपल्या न्यूजस्टोरीटुडे या वेबपोर्टलवर या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या मजकुराविषयी वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहोत.
आपले प्रेम आहेच, ते वृद्धिंगत होवो ही विनंती.
आपले स्नेहांकित,
टीम एनएसटी. 9869484800
प्रा. प्रतिभा सराफ यांची “तळपला रवी” ही सावरकरांवर कविता ! खूपच कठीण काम. पण तरीही खूपच सरळ, साधी आणि छान कविता लिहिली आहे. कवितेतून सावरकर साक्षात डोळ्यासमोर उभे राहतात !
– रिता पाटील
– पुढील वाचकांनी देखील ही कविता अत्यन्त आवडल्याचे आवर्जून कळविले आहे.
कुंदा पित्रे, (अमेरिका), जेष्ठ कवयित्री सुमन नवलकर, (मुंबई), श्रीकांत पाठक(इचलकरंजी), सागर सावन्त,(उलवे), रेखा जैन(औरंगाबाद), छाया सुभाष, मृणाल साठे(मुंबई), धीरूभाई, प्रविणा मोरे(सीबीडी), कैलास वेंरणेकर, सुनंदा पाटील, शालिनी मेखा, सुनील जावळे, जयश्री भिसे(मुंबई) २८.०५.२०२१.
– वर्षा भाबल यांचा जीवन प्रवास – भाग – 4 👍फारच सुंदर लेखन. वाचताना मजा आली. या निमित्ताने आठवी ते दहावी पर्यंत आम्हाला विषयवार शिकविणारे सर्व शिक्षक यांची आठवण झाली.
रश्मी हेडे यांनी प्रिय आई या मधील आईच्या गर्भाशयातील मुलगी आपल्या आईशी काल्पनिक बोलतानाचे रंगविलेले चित्र मनाला खूपच भावले. स्त्री भ्रूणहत्या करणे खरच चूक आहे.
🙏 धन्यवाद

मोहन आरोटे, कल्याण २७.०५.२०२१.
– दिव्या मगदूम ग्रेट.
– डॉ. शिवणे यांचा लेख खूपच माहितीपूर्ण.
– स्मिता, खरोखरीच मुंबईकर असाच आहे.
– श्री आणि सौ भुजबळ दोघांचेही लेख उत्तम.
– वर्षाचा जीवन प्रवास छान.
– बॉम्बे हाय कविता भावस्पर्शी.
– प्रतिष्ठित एमबिलियांथ पुरस्कार मिळाल्या बद्धल प्रथम इन्फोटेकचं अभिनंदन ..
– स्वतः च्या हक्कासाठी लढणारी मषणा आणि तिला न्याय मिळवून देणारी अनिता दोघी ही ग्रेट.
– आपल्या सहकारी अरुणाची
जीवापाड काळजी घेणार्या केईएम मधील स्टाफला सलाम.
– श्री भोईर ह्यांची कामगिरी कौतुकास्पद.
– तृप्ती काळे ह्यांचा महामारीचा अभ्यास दांडगा.
स्मिता, आपल्या सगळ्यांचे बालपण असेच होते. म्हणुन तर आपसूक ओठावर ओळी येतात……
कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन.
– श्री भुजबळांचे आभार
त्यांनी संविधान मित्र ही संकल्पना खूपच सोप्या भाषेत
सांगितली आहे.
– बुद्ध वंदन मधून पण छान माहिती दिलीत. नेपाळ बद्धल पण.

दमयंती पाटील, पनवेल. २६.०५.२०२१
– देवेंद्र भुजबळ सरांनी बुद्ध वंदन अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.स्वत: विपश्यना साधना केली आहे आणि सम्यक संबुध्दाचा सर्व मानवांना दिलेला मध्यम मार्ग आणि आर्य अष्टांगिक मार्ग उत्तम प्रकारे विशद केला आहे आणि ते देखील बौध्द पौर्णिमेच्या पावन दिवशी. हा सुवर्ण योग जुळवून आणला त्याबद्दल धन्यवाद.🙏🙏🙏
अशाच प्रकारे उत्तमोत्तम साहित्य आणि संस्कृती बद्दल माहिती वाचकांना उपलब्ध करून द्यावी हि सदिच्छा.🙏🙏🙏

स्मिता लोखंडे, नवी मुंबई. २६.०५.२०२१
– आदरणीय रश्मी हेडे यांची अतिशय सुरेख अशी मार्मिक आणि वास्तववादी भाव आसणारी कविता मनाला भावते. आन्तर्वेदनांचे पडसाद वाचकांच्या मनावर उमटतात. संस्कृती, चाली, रिती, भाती, संस्कार, या ओझ्याखाली स्वत:साठी जगायचे राहूनच जाते. तू जग तुला हवे तसे अशी साद मनाला कितीही घालण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात सभोवतालची परिस्थिती तसे करण्यास मुभा देत नाही. खुप छान वाटते ही कविता वाचुन….खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन रश्मी जी.🍁🌷🍁🌷🍁🌷👏👏👏👏👏👏 एक वाचक

शब्द स्नेही..डॉ.रमेश वाघमारे (औरंगाबाद)
🙏🏻🙏🏻👌👌👌👌२५.५.२०२१
– साहेब….खूपच छान …
बुद्ध वंदन ह्या लेखात ..आपण जगभरातील प्रसिद्ध बुद्ध विहारानां दिलेल्या भेटी आणि त्या प्रवासा दरम्यान आलेल्या अनुभवांचे केलेलं सुंदर वर्णन अगदी अप्रतिम !… त्याच सोबत… आपल्या लेखणीतून महावीर बुद्धांच्या जीवनप्रवासातील सर्व पैलूंचं दर्शन घडवलत …

– अनिल घरत (उरण) 🙏 २८.०५.२०२१.
नमस्कार,
marathi.newsstorytoday.com
संपादक, श्री. देवेंद्र भुजबळ सर व सहसंपादक, सौ. अलका भुजबळ, आपण उभयतां नवोदित लेखकांना वाचकांपर्यंत पोहचवण्यास पुढे सरसावलात. आपल्या मोठ्या मनाचा पाठिंबा सर्व लेखक जनासी अभिमानस्पद आहे.
– पोर्टलवरील प्रसारित लेख मनोरंजनीय.
देवेंद्र सरांची अभ्यासक वृत्ती त्यांच्या लेखातून खूप काही सांगून जाते. अलका मैडमच्या लेखन शैलीतून अनेक पैलू सुंदरच !
– कोरोना महामारीवरील अतिशय उपयुक्त गोष्टी वाचनात मिळतात.
– मानसीचे क्रियापदीक शब्दांचे लेख रुपी स्पष्टीकरण अति उत्तम.
– निर्जीव पडलेली अरुणा, खूपच हृदय स्पर्शी लेख.
– मष्णाबाईच्या पाठपुरावा वृत्तीचा अभिमान आहे. गरीबीने ग्रासूनही स्वतःच्या हक्का साठी वन वन भटकंती करत असता, तिला मदतीचा हात देणाऱ्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या कार्यास सलाम.
– कमल अशोक यांनी दिलेली माहिती छानच.
– तीन घटनांचे मिलन, म्हणजे वैशाख पौर्णिमा. निर्वाण हया शब्दाचा खरा अर्थ काय असतो ? भुजबळ सरांनी लेखात सुंदर दर्शवले आहे. धन्यवाद!
– लोकशाही अधिकार उत्तम मांडणी आहे.
– डॉ. मांडके यांचे माणुसकीला जपणारे व्यक्तिमत्व !
– पर्वतरांगा हा जणू जीवनाचा अविभाज्य घटक!
– उन्हाळयातील काळजी ! सुरेख माहिती.
आपल्या पोर्टलवर खरोखरच खूप छान लेख वाचायला मिळतात.
धन्यवाद, श्री.व सौ.भुजबळ. 🙏🏻

– वर्षा भाबल, नवी मुंबई. २८.०५.२०२१
– मेघना साने यांची कविता खूपच छान. 👍👍किती वाईट ना, परतीचा हुकूम न दिल्याने बिचारे काही जिवाला मुकले 🌴🌴
– सुरेखा गावंडेचा जीवन प्रवास व साहित्य खूप प्रेरणादायी 🙏

– अंजली जोशी, ठाणें २६.०५.२०२१
-न्युजस्टोरीटुडे या वेबपोर्टलबद्दल मी काय लिहू आणि कोठून सुरवात करू ?
हा प्रवास माझ्यासाठी खूप सुखकर आहे. एक लेखिका म्हणून मला हक्काचे व्यासपीठ लाभले. माननीय देवेंद्र भुजबळ ह्यांनी रिटायर्ड झाल्यानंतर देखील आपला लिखाणाचा छंद जोपासला . इतकेच नाही तर अनेक लेखकांना ह्या वेब पोर्टलमुळे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले . वाचकांसाठी देखील ही रोज मिळणारी मेजवानी जणू एक सोनेरी पर्वणी आहे ज्यामुळे लोकांच्या कार्याची माहिती मिळते. सकारात्मक वाचन केल्यामुळे मनाला एक उभारी मिळते.रोज नवीन वाचून शिकण्याचीही संधी लाभते आणि ह्या वेळेचा सदुपयोग होतो.
आज ह्या बिकट परिस्थितीत लांब राहून देखील एकत्रित असल्याचा भास होतो. ह्याचे सर्व श्रेय जाते ते न्युजस्टोरीटूडे ह्या वेबसाईटला. संपादक देवेंद्र भुजबळ सरांचे व सहसंपादक अलका भुजबळ मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन व न्युज स्टोरीसाठी अनेक शुभेच्छा.

– रश्मी हेडे. सातारा २५.०५.२०२१🙏🙏
उपरोक्त सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. असाच लोभ कायम असू द्या.

– संपादक
देवेंद्र भुजबळ सरांच्या सुविद्य पत्नी अलंकारांची मुलाखत पाहिली, ऐकली खरंच त्यांनी. म्हटल्याप्रमाणे प्रेरणादायी आहे. अलकाताई एक हरहुन्नरी व चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे संवाद कौशल्य सुध्दा वाखाणण्याजोगे आहे. उभयतांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.