नमस्कार मंडळी.
गेल्या काही दिवसांत प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
🕉️श्री विलासराव कुडके यांनी मित्रवर्य दिवाकर गंधे यांच्या पारिजात या दुर्मीळ पुस्तकाचा उत्तमरीत्या परिक्षण केले ते मनःपूर्वक आवडले़.
- — सुधाकर तोरणे.
“शिक्षक : नव्या पिढीचे शिल्पकार” लेख आवडला.
- –– माधव अटकोरे
ज्येष्ठ पत्रकार. नांदेड.
थोर विचारवंत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मांडलेले विचार व भारतीय जनतेला शिक्षणाचं पटवून दिलेले महत्व लेखात छान सांगितले आहे.
- — विलास प्रधान. मुंबई.
शिक्षकदिनाचे औचित्य साधून आजच्या लोभी शिक्षकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
खरेच आज शिक्षण आणि वैद्यकीय या दोन्ही क्षेत्रांना पूर्वी , पावन श्रेष्ठ म्हटले जात असे. त्यांना धंदा म्हणू लागले आहेत, हेच किती लज्जास्पद आहे. आजच्याच वर्तमानपत्रात कॉलेजेस मधील फीस वाढीबद्दल लेख आला आहे.
खेद होतो राधिका ताई. माझे वडील राधाकृष्णन यांना भेटले होते. चर्चा केली होती.
श्री तोरणेजींचे समीक्षण फार आवडले. बहुदा त्याचे कारण हे पुस्तक माझ्याजवळ आहे आणि त्यातील याच कथा मला खूप भावस्पर्शी वाटल्या होत्या.
सुमती ताईंची कविता छान.
- — स्वाती वर्तक. मुंबई.
एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे सविस्तर परिक्षण श्री गडकरी यांनी मोकळेपणाने केले आहे, छान.
- — सुनील चिटणीस. पनवेल.
दुर्मीळ पुस्तके: ८ “पारिजात ” या लेखावरील अभिप्राय….
In rare book series appreciator Kudke throws light over “Parijat”authored by late Diwakar Gandhe. The book is a collection of emotive stories. Gandhe was friendly with me when i was working in Languages. Those days he was working as an editor for Lok Rajya. He was also known as play critic n also for his writings in connection with cine world.
Stories in Parijat are penetrating n analytical of human psychology.In one of the stories a judge is affronted with a critical situation when in a case before him he had to impose punishment on a woman accused in whom he was emotionally involved.In Haak a man living in solitude wishes to get a call from someone. Upekshita is a story of an ugly girl with whom no one is willing to marry her. Thus a life full of gloom we come accross. In Shalya doctor fails to provide timely treatment to an ailing wife of his teacher n she dies sans treatment that causes deep regret to the doctor n also pierces our heart. Tada is a story of a woman can’t conceive due to infertility n still lives in fantasy that she had delivered a child. Her mental condition is worrying. The book consists of 12 stories. In all of them the reader experiences similar uneasiness n they percolate pathos. The author tremendously successful in drawing the sensational picture of disturbed human mind. Integrity is established with the character n u experience the similar soulful experience. Thus the efforts made by our editor Bhujbal sir n Vilasji Kudke enable us to have this great literary pleasure else it was impossible. I thank them.
— Shri Ranjitsinh Chandel, Yavatmal
एका दुर्मिळ कथासंग्रहाचा छान परिचय करून दिला आहे. दिवाकर गंधे हे माझे एक ज्येष्ठ सहकारी… त्यांची भेट झाल्यासारखे वाटले. धन्यवाद.
— श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती)
नर्मदालयाची कथा वाचनीय.
भारती ठाकूरजींना अभिवादन !
- –– अरुणा मुल्हेरकर, अमेरिका.
अबुधाबी चा गणेशोत्सव खूपच आवडला. खरोखर देशाबाहेर गेलेली आपली मंडळी सणवार, आपली संस्कृती सारे काही जपण्यासाठी कसे धडपडतात हे वाचून अंगावर काटा येतो आणि त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असे वाटत राहते ..छान माहिती. श्री कुलकर्णीजींचे आभार
इंग्लंड मीन टाईम चा लेख ही असाच बहारदार .पण मध्यंतरी श्री वाकणकर यांच्या शोधातून जाणवले.. मीन टाईम खरे तेथे नाहीच. डॉ शिरसाट यांचा लेख वाचनीय आहे.
श्री चांदेजींनी अवती भवती मध्ये वेगळीच माहिती दिली आहे. नाच गं घुमा ..माझ्या घरी आहे. त्यावर आलेली ढीगभर पत्रे, भालजींच्या दुसऱ्या बाजूस नकार देणाऱ्या माधवी ताई, लता मंगेशकर यांचे गुपचुप राहणे, कर्वे यांचे 5 मैल चालणे सारेच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ईलो ईलो बाप्पा कविता आवडली.
- –– स्वाती वर्तक. मुंबई
प्रेरणादायी पोलिस अधिकारी आणि कामगारांचे लाडके मदन फडणीस खरोखरच सुंदर, वाचनीय.
- — विलास प्रधान. मुंबई.
‘मी पोलीस अधिकारी’ या पुस्तकाचे ॲड. हरीष साळवे यानी केलेले परीक्षण आवडले.
आदरणीय सुनीता नाशिककर यांच्या सेवेचा प्रेरणादायक प्रवास खरोखर इतराना जाणीव करून देणारा आहे.
पोलीस अधिकारी आणि दंगली, मारामारी, गुन्डाशी मुकाबला याचा फार जवळचा संबंध येतो. समाजघातक व्यक्तीला धडा शिकवताना अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागतो. मैडम नाशिककर यान्च्या सेवेतील अनुभव अत्यंत बोलके आहेत.
लोकांच्या जीवीताचे, मालमत्तेचे संरक्षण करताना पोलीस जखमी होतात, जसे सीमेचे रक्षण करणारे जवान जखमी होतात. देश आणि देशातील जनतेच्या संरक्षणार्थ लढता लढता जे गंभीर जखमी होतात अशा वेळी त्याना विविध अवयवाची सुध्दा अवश्यकता असते. वेळेवर अवयव मिळाला तर नवे जीवन देता येते म्हणून आम्ही सतत अवयवदान देहदानाच्या विचाराचा प्रचार करीत आहोत.
प्रत्येक माणूस अनमोल आहे. त्याच्या शरीरातील प्रत्येक अवयव लाख मोलाचा आहे. आपण परंपरेचा आदर राखून मरणोत्तर देहदान करणे हेच महान पुण्य आहे.
समर्पित भावनेने दुसर्याचा जीव वाचविण्यापेक्षा दुसरे कोणतेही महान दान नाही.
सर्वानीच आनंदाने, समाधानाने आणि सकारात्मक विचाराने जगावे आणि जाता जाता मरणोत्तर देहदान अवश्य करावे असे आम्ही नम्र आवाहन करीत आहोत..
आदरणीय मैडम नाशिककर यानी जसे अनुभव कथन केले तसे प्रत्येक पोलीस अधीक्षक स्तराच्या अधिकाऱ्यांनी पुस्तक रूपाने जनतेसमोर यावे. आपले मनापासून स्वागत.
- –– माधव अटकोरे.
ज्येष्ठ पत्रकार. नांदेड.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800