ते वागतात ती नीती
ते सांगतात तो धर्म,
ते करतात ते कर्म…
तेच जाणतात वर्म
ते करतात ते पुण्य
ते म्हणतील ते पाप,
ते म्हणतात ते खरे…
ते म्हणतील तो बाप
त्यांना नको ते नाही
ते सांगतील ते सर्व,
ते बोलतात ते सत्य…
ते म्हणतील ती पूर्व.
ते इतिहासाचे कर्ते
ते काळाच्याही पुढले,
इतरांच्या उध्दारास्तव…
ते आभाळातून पडले.
— रचना : साहेबराव ठाणगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800