प्रतिज्ञा बध्द कृष्ण
शस्त्र ना धरी करी
युध्दाचाआरंभअंत
स्वता किमया करी
नंदलाला नटखट रे
गोपिकांचे वस्त्रहरी
लाजराखे कृष्णेची
कुणांस न कळेहरी
मालक या विश्वाचा
दूध लोण्याची चोरी
मनामनात व्यापला
करी कसे शिरजोरी
वेड लावे गोकुळाले
बासुरीसूर मनोहारी
अल्पभक्ती देई खूप
मुळीचं ना व्यवहारी
मूर्तमनात साठलेली
नामस्मरणजिव्हेवरी
रमा म्हणतो संसारी
विरह लावे जिव्हारी
नारायणी सेना एका
दुसरीकडेस्वयंमुरारी
अधर्मापुढे सहजतेने
सुधर्माची पारडेभारी
प्रिय सुदाम्यांचे पोहे
रमला विदूराचे घरी
ऐश्वर्यसंपन्न दुर्योधना
परत पाठवी माघारी
धन्यवाद देई सुहास्य
शाप देता ती गांधारी
मृत्यूला स्वयं पाचारी
गुप्त होतो गिरिधारी
अचंबित कृष्णलीला
अंतर्क्य खेळी मदारी
चक्रव्यूहा अडक तरी
समस्तजगता उध्दारी

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
