नमस्कार, मंडळी. आपल्या आठवणी शैलीदारपणे सांगितल्या आणि त्यातही त्या रोमहर्षक असतील तर त्या वाचकांना खिळवून ठेवतात, असे बांगलादेश मुक्ती लढ्याच्या सुलभाताई गुप्ते यांच्या व प्रा डॉ किरण ठाकूर सरांच्या “बातमीदारी करताना” या स्मरण मालेस मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसून येते .
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या लेखनाला आणि स्किलबुकचे जनक, संशोधनक डॉ किरण झरकर यांच्यावरील लेखनाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
या व इतर लेखनाला मिळालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक
जीवन प्रवास – भाग – १६
वर्षा खूप छान लिहिलेस असेच छान छान लिहित जा शुभेच्छा तुला
– Vrunda Vijay Adhatrao
बातमीदारी करताना – भाग – १६
अप्रतीम !! फार सुंदर लेख..
केपीके कुट्टीं सारखी पत्रकारीता अभावानेच ..
डॉ. किरण ठाकूर किती भाग्यवान..!! त्यांना पत्रकारितेच्या वाटेवर असे मार्गदर्शक लाभले !!
केपीके कुट्टी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– राधिका भांडारकर.
बहुगुणी अशा के पी के कुट्टी यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
लेखाद्वारे त्यांची सर्व माहिती मिळाली.
– विजय कुलकर्णी
यशस्वी डॉ श्रुती
खूप छान लेख..
एका महत्वाकांक्षी, प्रयत्नवादी, समंजस, प्रेमळ कार्यरत व्यक्तीचा
या लेखातून परिचय झाला. डॉ. श्रुती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
आणि, मी पोलिस अधिकारी झाले..
एक शौर्यकथा वाचल्यासारखे वाटते
– राधिका भांडारकर
“स्किलबुक” जनक : डाॅ. किरण झरकर
डॉ किरण झरकर यांच्यावर लीहलेला आपला लेख खुप छान आहे. त्यांच्या कार्याची ओळख अतिशय सुंदर शब्दात आपण करून दिली आहे श्री देवेंद्र भुजबळ सर.
– राजेंद्र वाणी, मुंबई
डॉ. किरण झरकर यांच्या संशोधन वृत्ती कार्यास मानाचा सलाम ! हुन्नरबाज व्यक्तीच्या प्रेरक कार्याची ओळख, देवेंद्र भुजबळ सरांनी आपल्या पोर्टल वर, स्व: लिखित प्रसारित केली. सर तुमचे खूप खूप आभार ! डॉ. झरकर यांचे मनापासून अभिनंदन !
– सौ. वर्षा महेंद्र भाबल
डॉ.झरकर सरांचे शासकीय सेवेत राहून देशासाठी व मराठवाड्या सारख्या मागास विभागातील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन चाललेले संशोधन देश व मानवविकासाला नक्कीच उपयोगी ठरेल.
डॉ.झरकर सरांच्या या नेत्रदीपक यशाचा मानाचा सलाम….
संपादक मा.भुजबळ साहेब आपण डॉ. किरण झरकर सर यांच्या कार्याचा आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध देऊन सन्मान केला. त्या मुळे आजच्या नव संशोधकाची व त्यांच्या कार्याची ओळख आम्हाला झाली. त्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार.
– श्री. अंकुशराव तानाजी
डिजिटल स्किलबुक मुळे शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून येणार आहे. डिजिटल स्किलबुकचे जनक डॉ. श्री किरण झरकर यांचे त्रिवार अभिनंदन 🌹
तसेच श्री देवेंद्रजी भुजबळ साहेब यांनी सुंदर शब्दांकन केले त्याबद्दल त्यांचे आभार 🙏
– Mohan Arote.
फेसबुकपेक्षा चारपट मोठा असा “स्किलबुक” हा प्रकल्प सुरू करून शेतकरी व युवकांच्या जिवनांत आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या डाॅ. झरकर यांचे खुप अभिनंदन व त्यांना या कार्यात भरघोस सुयश मिळो या शुभेच्छां.
– Mrs Lina Phatak. U. K.
डाॅ किरण झरकर ..एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व.
स्किल बुक.. हे संशोधनात्मक कार्य अत्यंत अभिमानास्पद
– राधिका भांडारकर.
ओठावरलं गाणं
माझे हे आवडते गाणे. रसग्रहण फारच छान.
यापुढे कधीही गाणे ऐकतांना तुमचे शब्दांकन आठवेल.
– आशा लिंगायत.
छान च गाणी आणि माहिती😊, सुंदर विवेचन, फारच सुंदर, सुंदर रसग्रहण. फारच छान. फारच सूंदर रसग्रहण.
– Gaurav, Kshitij kulkarni, नारायण लक्ष्मण वैद्य, निलाक्षी पिसोळकर, Virag Bhave.
गुरुवायूर मंदिर – भाग:-२
खूप छान माहिती मनीषा
शब्द शब्द पेरताना..
सुंदर आशयघन रचना..
शब्द शब्द म्हणजे काय
शब्द म्हणजे माझे मन
सरस्वतीचा वरदहस्त
हेच जगती मोठे धन….
– प्रीती भिसे, बेंगलोर
खूप छान संदेश देणारी कविता.
शब्दांच्या खेळातून
निखळ आनंद घ्यावा
मत्सर द्वेष दूर करुन
आनंद उधळावा…
अगदी महत्वपूर्ण संदेश
– राधिका भांडारकर
साहित्य संमेलन आणि “मी” !
सुरेखाताई खूप छान लिहिले आहे !
आपण दाखवलेला विश्वास, आनंद आणि भरभरून दिलेली दाद यासाठी मनापासून धन्यवाद !
– प्रतिभा सराफ
सुरेखा, तुझे त्रिवार अभिनंदन.साहित्यिक श्रेत्रात,
प्रगती पथावर सतत यशस्वी पाऊले पडतील असे ईश्वर चरणी सदिच्छा. मनापासून माझ्या सखीला धन्यवाद.
– पूर्णिमा शेंडे.
सुरेखाताई तुमचे अभिनंदन..
साहित्य संमेलनाच्या वातावरणातले क्षण खरोखरच आनंददायी…
– राधिका भांडारकर
अभिनंदन सुरेखा..…..
– स्नेहा मोहिते(बंड्या)
ज्ञानपुंज डॉक्टर बाबासाहेब…
भारतीय घटनेचे शिल्पकार डाॕक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि देवेन्द्रजी आपणही जे कार्य करत आहात आणि यापुढेही करत रहाणार आहात त्या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन..
– प्रीति परदेशी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी
समाजातील विविधांगी रुढी, परंपरा तसेच धार्मिक + जातीय अंधश्रद्धा, यात अडकलेल्या भारतीय समाजाला बाहेर काढण्यासाठी व समाजाला नवे “आधुनिक भारतीय समाज” निर्माण करण्यासाठी
जे जे प्रयत्न केले…त्यात हिंदूधर्म सुधारणेचा त्यांनी केलेले काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा सत्याग्रह, चवदार तळे सत्याग्रह, मुंबई सर्व कर्मचारी संप, महिलांना शिक्षण व संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे या साठी दिलेला मंत्री पदाचा राजीनामा असेल….
समाज सुधारक, सर्व धर्म शास्त्राचे अभ्यासक, संपादक, पत्रकार, वकील, कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, प्रभावी वक्ते, लेखक, अशा किती तरी बहुआयामी रुपातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपण त्या काळात संपूर्ण भारतीय समाजाला समजून सांगितले…
मा. देवेंद्रजी भुजबळ साहेब आपलेखूप खूप धन्यवाद आणि आपण केलेल्या या महान कार्याला मनापासून प्रणाम !!!
– श्री. अंकुशराव तानाजी
देवेंद्रजींनी खुप सुंदर शब्दात सुरेख लेख लिहून एका थोर, महान पुरूषांना, डाॅ. बाबासाहेब आंबेंडकरांना विनम्र अभिवादन केले आहे. डाॅ. आंबेडकरांबद्दलचा सार्थ अभिमान त्यांत दिसून येतो. आणि विशेष म्हणजे डाॅ. आंबेडकरांनी उचलेली शिक्षणाची धुरा देवेंद्रजींनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व मला वाटणारा अभिमान व्यक्त करते आहे. 🙏🙏🙏
– Mrs Lina Phatak, U. K.
बातमीदारी करताना – भाग – १५
परिस्थिती चे वर्णन आणि लेखांकन अप्रतिम !!
– Vijay Kulkarni
आठवणी बांगला देश मुक्तीच्या
अतिशय रोमहर्षक वर्णन..सुलभाताई युद्धाच्या कथा रम्य असतात,मात्र तुमच्यासारख्या आयुष्य पणाला लावणार्या व्यक्तींच्या जीवनात किती ऊलथापालथ होत असेल हे समजून ऊर अभिमानाने भरुन येते…
– राधिका भांडारकर
नाती, जपू या !
Meaningful & true
– प्रीति परदेशी
ए दुनिया एक नाटक है,
ऊस नाटकमें हम सब काम करते है,
परदा गिरते ही हम सब को सलाम करते है…
वक्त रहतेही रिस्ते निभाना सीखो…
खूप छान लेख आणि त्यातून दिलेला संदेश…
धन्यवाद सौ.हेडे मॅडम
– श्री. अंकुशराव तानाजी.
भाग क्रमांक १५ वाह वाह, सर, तुम्ही कधी काळी मराठी वृत्तपत्रात व तेही सकाळ मध्ये होतात हे या लेखामुळे कळले. ऐन उमेदीच्या काळात तुम्ही किती धैर्यवान होता ते सुद्धा आजच्या लेखातून समजले. तुमची ही चिकाटी आणि आत्मबळ हेच आमच्या सारख्याना प्रेरणा देणारं आहे । मज्जा आली वाचायला अत्यन्त थरारक👌
– एम पी जोशी. बदलापूर
Hadn’t known this adventurous KT before! I’m vicariously thrilled.
Keep more of these coming.
I had covered the infamous combination of Anti-quota agitation and communal riots of 1985-86 in Gujarat, had seen and felt the worst of it. But when later asked to cover a communal flare-up in Aurangabad, I had developed cold feet. Because, I didn’t know the lay of the land.
Would you believe it? You did better in East Pakistan.
Vijapurkar Mahesh:
..
खूप मोठं धाडस ! वाचताना प्रत्यक्ष स्वतः तो अनुभव घेत आहे असं वाटतं.
– विना पवार औरंगाबाद
जिवावरची बातमीदारी.
भारत पाकिस्तान युद्ध डोळ्यासमोर येऊन
गेले. मुक्तीवाहिनी बद्दल वाचले होते, आपण
तर साक्षीदार होता !
– अमर पांडे, सांगली
हे आत्ताच वाचलं. १९७१ च्या युध्दाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील तो नेमका पंधरवडा चालू आहे. हे धाडसी आणि थरारक प्रकरण तुम्ही अगदी ‘तुरंत प्रभाव से’ महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ वगैरेंसारख्या प्रिंट वृत्तपत्रात दिले पाहिजे ही माझी अपेक्षा !
– भूषण तळवलकर