तस्वीर बना ले …
तस्वीर, तसबीर हा उर्दू आणि हिंदी शब्द. चित्र, छबी, रूप, प्रतिकृती, छायाचित्र, प्रतिमा, चित्र काढणे. तर मराठीत चित्र, छबी आणि फोटो अशा अनेक अर्थाने हा शब्द काव्यात येतो.
अनेक हिंदी चित्रपट गीतांमध्ये या अर्थाची छटा असलेली अनेक कर्णमधुर गीते आहेत. विशेष करून रोमँटिक गाण्यांमध्ये प्रेमी युगल आपल्या प्रियतमाचे वर्णन करतांना तस्वीर शब्द कानावर पडतो.
चित्रपट सदरात या शब्दा भोवती गुंजन करणारी काही मधुर गीते घेऊन आज आपल्या भेटीला येत आहोत...
तस्वीर म्हटले की कानात प्रथम गुंजतो तो तलत मेहमूद यांचा मखमली आवाज. ‘तस्वीर बनाता हूं तस्वीर नही बनती/एक ख्वाब सा देखा है, ताबीर नही बनती’. चित्रपट बारादारी (1955) संगीत नौशाद. कलाकार चंद्रशेखर, गीताबाली, अजित, प्राण.
या गीताआधी तलत मेहमूद यांचे फ़ैयाज लिखित, ‘तसबीर तेरी दिल मेरा बहला ना सकी’ हे गीत असेच गाजले होते. कमल दासगुप्ता यांनी संगीत दिलेलं हे गीत 1944 साली एचएमव्ही ने रेकार्ड केले होते.
मग येतो ‘ताजमहाल‘ सिनेमा. प्रदीप कुमार आणि बिना राय अभिनित ‘जो बात तुझमे है वो ‘तेरी तसबीर मे नही, हे रफी यांच्या आवाजातील गाणं आजही रसिकांना आवडते.
असेच एक धमाल गीत देवानंद आणि गीताबली यांच्यावर चित्रीत झालेलं, ‘तदबीर से बिघडी ही तकदीर बनाले, अपने पे भरोसा है तो डाव लगाले’, तराने पुराने गीतातून हमखास ऐकायला मिळते. 💐आवाज गीता राय (बाली)आणि संगीत एसडी बर्मन. चित्रपट बाजी (1951).
याच काळातील आणखी एक मधुर गीत आहे ते 1952 साली आलेल्या ‘दिवाना‘ चित्रपटातील. आता पूर्ण विस्मरणात गेलेलं. ‘तस्वीर बनाता हूं तेरी खून ए जिगरसे/देखा है तुझे मोहबत की नजरसे’/ कलाकार सुरेश आणि सुरैया. आवाज मोहमद रफी, गीत शकील बदायुनी आणि संगीत नौशाद.
देवानंद आणि माला सिन्हा याचा माया (1961) नावाचा चित्रपट. त्यातील रफी आणि लता यांच्या आवाजातील हे रोमँटिक गीत. ‘तसवीर तेरी दिल मे, जिस दिल से उतारी है, फिर तुझे संग लेके, नये नये रंग लेके, सपनो की महफिल मे’.संगीत सलील चौधरी.
बेताब हा सनी देवल आणि अमृता सिंग, शम्मी कपूर अभिनित चित्रपट त्यातील गीत संगीतामुळे आजही लक्षात आहे. त्यातील शब्बीर कुमार यांच्या आवाजातील आर.डी. बर्मन यांनी संगीत दिलेले हे गाणं. ‘ये मेरी जिंदगी बेजान लाश थी /बरसो से प्यार को’ तेरी तलाश थी/ आज खोई जिंदगी मिल गयी/’तेरी तसविर मिल गयी/.. तर ‘मेरी तसबीर लेकर क्या करोगी, क्या करोगी तुम’ हे आशा आणि रफी यांच्या आवाजातील ‘काला समुंदर’चे आनंद बक्षी यांनी लिहिलेले आणि एन दत्ता यांचे संगीत असलेले मनमोहक गीत.
याच कडीतील ‘तसबीर लेकरं क्या करोगे’ ला उत्तर देणारे गीत. ”तेरी तसबीर को सीनेसे लगा राख है, अपनी दुनिया से अलग जा रखा है/ चित्रपट ‘सावन को आने दो‘. कलाकार अरुण गोविल आणि झरीना वहाब.
धर्मेंद्र आणि अभिताभ बच्चन या गाजलेल्या आणि अनेक सिनेमात एकत्र काम केलेल्या जय विरु जोडीचे दोन चित्रपट. त्यातील महान (1983) चित्रपटातील किशोरकुमार यांच्या आवाजातील आर डी बर्मन याचे संगीत असलेले हे गीत..
‘जिधर देखू तेरी तसबीर नजर आती है, तेरी सुरत मेरी तकदीर नजर आती’/ तर ‘इस्क पर जोर नही’ या चित्रपटातील धर्मेंद्र साधना अभिनित, ‘मेहबूबा तेरी तसबीर किसीं तरह मै बनाऊ, तेरी जुल्फो की दास्तान किसीं तरह मै सूनाहू’ एक सुरेल गीत आहे. मोहमद रफी यांनी गायलेले हे गीत लिहिले आहे आनंद बक्षी यांनी. संगीत एस.डी. बर्मन. किशोर कुमार, सुरेश वाडकर आणि लता यांच्या आवाजातील बेमीसाल (1982) चित्रपटातील हे गीत. ‘कितनी खूबसुरत ये तसबीर है, मौसम बेमीसाल बेहसीन है/ये काश्मीर है, ये काश्मीर है/अभिताभ बच्चन, विनोद मेहरा आणि राखी अभिनित या गीताला आर .डी. बर्मन यांनी सजविले आहे.
‘फूल फूल पे बनी तेरी तस्वीर, फूल फूल पर लिखा तेरा नाम/हो तुझे सलाम,हो तुझे सलाम/ उदीत नारायण आणि कविता कृष्णामूर्ती यांचा आवाज असलेले हे गीत आहे ‘फूल‘ चित्रपटातील. कलाकार माधुरी दीक्षित आणि कुमार गौरव. संगीत आनंद मिलिंद.
तर जीवन साथी (2006) या सिनेमातील हे गीत -‘हर तरफ आपकी तस्वीर है, देखीये किस तरह हमको आपसे प्यार है’. अभिजित आणि साधना सरगम यांच्या आवाजातील हे गीत अक्षय कुमार आणि करिषमा कपूर वर चित्रीत आहे. संगीत नदीम श्रवण.
शाहरुख खान आणि काजोल यांचा परदेश हा एक गाजलेला सिनेमा.त्यातील हे लोकप्रिय गीत. ‘जरा तस्वीर से तू निकलते आ मेरे मेहबूबा’ कुमार सानू आणि अलका याग्नीक यांनी आवाज दिलेला. ‘फिर लहराया दुपट्टा’ सिनेमातील हे अर्थवाही गीत.’तुमने रख तो ली तस्वीर हमारी, कही न हो ऐसा मौसम बदलते रंग हो.. आवाज अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास. संगीत आनंद मिलींद. खूप सुंदर.
खरं आहे एकमेकांच्या प्रेमात असो की सृष्टीच्या विविध रंगरूपाच्या अंतरंगात, मानवी चेहरा असो की कला चित्र, अनेक भावनांचे तरंग त्यात उमटत राहतात. सुख दुःख, वेदना, आनंद, विरह, ओढ आदींचे रंग त्यात अनुभवयास येतात. हा शेर ऐकताना त्याचाच प्रत्यय येतो.’तेरी सुरत से किसीं की नही मिलती नही सुरत, हम जहां में ‘तेरी तस्वीर लिए फिरते है’.

– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
I really want to!!! Whatever you suggest…
तस्वीर, तसबीर या उर्दू भाषेतील शब्दाचा उपयोग
करून अनेक लोकप्रिय गीते सिनेसृष्टीत तयार झाली.
याची सफर घडवली.
धन्यवाद सर.