पाऊस ढगांतून आला
पाऊस नभांतून आला
पाऊस दिशांतून आला
तव नेत्रांमधूनि आला.
चिंब चिंब ओलेत्या
मग कणांकणांतून
पाऊस मोहरून आला.
पाऊस थरारून आला
पाऊस तरारून आला
पाऊस बहारून आला
पाऊस शहारून आला.
पाऊस गुलाबी आला
सळसळली हिरवी पाने
कुजबुजले रानीं पक्षी
पाऊस शराबी आला.
रिमझिमता पाऊस आला
रुणझुणती नाजूक धारा
गुणगुणतो कानांमध्ये
भिजलेला अवखळ वारा.
पाऊस असा हा आला
पाऊस आला नि गेला
परी नकळत जाताना तो
मृदगंध देऊनी गेला.

– रचना : नयना निगळ्ये, अमेरिका
Lai bhari
पाऊस फारच छान.
चिंब भिजवून गेला..
खट्याळ पाऊस