Monday, December 22, 2025
Homeबातम्याशब्दसेल्फी

शब्दसेल्फी

अजेय संस्था शब्दसेल्फी कार्यक्रम दरवर्षी ठाण्यामध्ये सादर करते. हे शब्दसेल्फी चे 5 वे वर्ष आहे.

शब्दसेल्फी हा कवितांवर आधारित कार्यक्रम आहे पण इतर कार्यक्रमा प्रमाणे फक्त कविता वाचन नाही.
या कार्यक्रमात काव्यनाट्य, काव्यश्रुंखला,
काव्यचित्रपट, काव्यांकिका, काव्यमेडली या प्रकारे कवितेमधला आशय घेऊन कविता सादर केल्या जातात.

या वर्षी ‘शब्दसेल्फी‘ चा विषय आहे कँडिड रोमँटिक मराठी असा आहे. यात मराठीमधल्या रोमँटिक कविता आणि त्यावर सादरीकरण होणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची आहे.

अनेक महिने या विषयावर अभ्यास करून, निरनिराळे पुस्तकं वाचून कवितांची निवड करून याची संहिता तयार केली जाते, तसेच पाच ही वर्षी याचे वेगळेपण संकल्पनाकार डॉ.क्षितिज कुलकर्णी यांनी जपले आहे. या कार्यक्रमाचा निर्माता गौरव संभूस आहे. शब्दसेल्फी चे निवेदक डॉ. क्षितीज कुलकर्णी, राजस वैद्य आहेत. या कार्यक्रमात अजेयची टीम काम करत आहे, आयोजन ही पाहत आहे.

या वर्षी शब्दसेल्फी मध्ये अनोखा प्रयोग सादर होणार आहे. शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त शांता शेळके यांच्या, काही गाण्यावर नृत्य, युवा टीम सादर करणार आहे. याचे नृत्य दिग्दर्शन कार्तिक हजारे करत आहे.

हा कार्यक्रम अजेय संस्था फेब, मार्च दरम्यान सादर करते पण lockdown मुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. आता हा कार्यक्रम 22 डिसेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे सादर होणार आहे.

– मराठी कविता मांडणारे काव्यचित्रपट
– काव्यनाट्य, काव्यमुकनाट्य, प्रथम शब्दसेल्फी मध्ये मांडले गेले.
– मराठी कवी आणि कवितांचा, त्यांच्या शब्द-अर्थांचा आजच्या काळाच्या संदर्भाने शोध घेणारा एकमेव मराठी कार्यक्रम. शब्दसेल्फी.
– रोमँटिक मराठी कविता उलगडणारा सोहळा.
– दृष्टी देणारे अभ्यासपूर्ण निवेदन.
– जुन्या मराठी रोमँटिक गाण्यांवर आज ही तितक्याच जोशात थिरकणारी तरुण पावलं अर्थात नृत्य.
– कवितांची लागोपाठ मांडणी, काव्यशृंखला.

या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाली आहे तिकीट दर 150₹ आहे. तसेच काही विनामुल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाच्या 3 दिवस आधी पासून तिकीट विक्री गडकरी रंगायतन येथे सुरू आहे. फोन बुकिंग साठी संपर्क 9930175527, 8928864171
तसच या कार्यक्रमात काय सादर होणार आहे याची झलक पाहण्यासाठी या लिंक वर जावे.
लिंक- http://Fb.me/zapurza2021

– टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37