आमचे परम स्नेही संदीप पगारे सर यांचे हे स्टेटस बघून सुचलेल्या ह्या ओळी…
पोशिंद्याचे घेतांना, भाव करतो कशाला।
दोन शिल्लक दिले तर, झळ बसते खिशाला।।
कपाळावर घाम त्याच्या, अहोरात्र वाहतो।
भूक आणि भाकर तो, यामध्येच पाहतो।।
सुकलेला चेहरा त्याचा, सांगून जातो स्पष्ट।
पोशिंद्याच्या नशिबी, किती आहे कष्ट।।
दैवाचा भाग मानून, सगळं काही सोसतो।
तरी मला बाप माझा, हसतांना दिसतो।।
किती कष्ट घेतले ते, जाऊन बघ शेतात।
फुकट चांगला भाजीपाला, मिळतो ना हातात ?।।
पोटासाठी लागते ते, मिळत नाही बसून।
शिल्लक तरी पारड्यात, सहज मिळते हसून।।
कशी पिकते शेती, येईल तुला कळून।
एक दिवस माझ्यासंगे, घाम बघ गाळून।।
मग तुला कळेल की, कशी पिकते शेती।
काय मेहनत घेतो आणि, काय पडते हाती।।
नशिबाचा भाग आहे, असे मानून भोगतोय।
जगाचा पोशिंदा हा, कष्टातच जगतोय।।
– रचना : रामदास आण्णा

खूप ह्रदयस्पर्शी!!
बळीराजाचं दु:ख ना कळे कुणा