येत्या 26 डिसेंबर 2021 रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख महिला महाविद्यालय, अमरावती येथे
“शब्दवेल” साहित्य संमेलन आहे. त्या निमित्ताने थोडेसे हितगुज…..
सर्वप्रथम शब्दवेल साहित्य संमेलनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करु ॥
शब्दची आमुच्या जिवाचे जीवन।
शब्दें वाटू धन जनलोकां॥
-संत तुकाराम
हेच शब्दधन मनामनात रूजवण्यासाठी दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी ही साहित्यिक चळवळ सुरु झाली. कवी मित्र अंकुश चौरपगार, अशोक पारखे व अभिजित खाडे या मित्रांच्या सहकार्याने हा समूह सुरु केला म्हणून पहिली स्पर्धा ‘मैत्री’ या विषयावर घेण्यात आली आणि तिथून ही शब्दवेल बहरायला सुरुवात झाली. नंतर ‘आगमन गणरायाचे’, ‘शब्दवेल संगे जागर नवरात्रीचा’, ‘सल’ लघुकथा स्पर्धा, ‘शब्दवेल महाविजेता’ अशा प्रकारच्या पन्नासच्या वर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या.
मित्रवर्य अभिजित खाडे यांच्या संकल्पनेतून पहिल्या वहिल्या शब्दवेल App ची निर्मिती झाली. दैनिक, साप्ताहिक, मासिक अशा विविध स्तंभलेखन मालिकांमध्ये जवळपास 70 लेखक लिखाण करायला लागले. आतापर्यंत सात ऑनलाइन कवीसंमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत.
दिनांक 23 फेब्रुवारी कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे राज्यस्तरीय कवी संमेलन यशस्वीपणे पार पाडले. ज्येष्ठ गझलकार ए.के शेख या संमेलनाला उदघाटक म्हणून लाभले. मा. गीतांजली टेमगिरे (राज्यकर उपायुक्त) मिलिंद सरदेशमुख राज्यकर अधिकारी, वस्तू व सेवा कर विभाग मुंबई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संमेलन यशस्वी करण्यासाठी संपुर्ण टीम शब्दवेलने प्रयत्न केले आणि एक अविस्मरणिय संमेलन यशस्वी झाले.
शब्दवेलचा पहिला ई-दिवाळी विशेषांक ‘सर्जनशीलतेचा नवाविष्कार’ सर्व वाचकांच्या पसंतीस उतरला.
शब्दवेलचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करणारी टीम शब्दवेल, त्यामध्ये मार्गदर्शक कविवर्य अरुण म्हात्रे सर, मा. प्रतिभाताई सराफ, सचिव अश्विनीताई अतकरे, उपाध्यक्षा रंजना ताई कराळे, उपाध्यक्षा शितल ताई राऊत व्यवस्थापक नरेन्द्र लोणकर, प्रमुख कार्यवाह प्रविण सोनोने, हे प्रत्येक जबाबदारी तेवढ्याच नेटाने पार पाडतात. त्याचप्रमाणे नाशिक, अहमदनगर नागपूर, अमरावती, पुणे जिल्हा कार्यकारिणी मधील सदस्य तितक्याच ताकदीने कार्य करतात आणि त्यामुळे कुठलाही कार्यक्रम यशस्वी होतो.
हाच वेगळेपणा जपून ठेवण्याचा प्रयत्न शब्दवेल करत आहे. शब्दवेल वर असलेला विश्वास आम्ही असाच टिकवून ठेवू याची मनाच्या गाभाऱ्यातुन ग्वाही देतो.
गेल्या काही दिवसा आधी विविध मान्यवरांचे लाईव्ह कार्यक्रम शब्दवेल फेसबुक गृप वर घेण्यात आले. शब्दवेलच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे उदघाटन मा. किशोर बळी यांनी केले तर मा. ज्ञानेश वाकुडकर, कविवर्य अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख, अभिनेत्री वर्षा दांदळे, कवी विठ्ठल कुलट, लोककवी प्रशांत मोरे, कवी दुर्गेश सोनार, कवी अशोक बागवे, कवि नितीन देशमुख, हणमंत चांदुगडे सर, प्रा. विजय काकडे, दिग्दर्शिका श्वेता बिडकर, कवी प्रविण सोनोने, कवी नितीन वरणकार, अशोक नायगावकर, महेश केळुसकर, मंदाकिनी पाटील पोहेकर-कुलकर्णी, सतिश पावडे सर, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. सुजाता मराठे, श्याम ठक, प्रा. महादेव लुले, नरेन्द्र लोणकर, रश्मी लोणकर, डॉ. उल्का नाईक निंबाळकर, मा. अंजली ढमाळ, सहस्त्रनाद वाद्य पथक प्रमुख अमी छेडा, अभिनेते राजेश देशपांडे यांसारख्या अनेक नामवंत साहित्यिकांनी लाईव्ह सादरीकरण केले.
याचबरोबर शब्दवेलच्या मार्गदर्शक प्रतिभा ताई सराफ यांनी घेतलेली डॉ विजया वाड यांची मुलाखत फेसबुक व्यूज मध्ये नवा उच्चांक गाठणारी ठरली.
शितल राऊत यांच्या गुजगोष्टी, अश्विनी अतकरे यांचे इटुकले पिटुकले, नरेंद्र लोणकर यांच्या ‘काळजातल्या कविता’ या कार्यक्रमांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
यानंतर शब्दवेल चे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचा शब्दवेलचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात साहित्यिक उपक्रमासोबत सामाजिक उपक्रम राबविणे हा शब्दवेलचा हेतु आहे. याच विचाराची अंमलबजावणी म्हणून शब्दवेलची अहमदनगर, अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने भविष्यात तिथे साहित्य संमेलन घेणे, सामजिक उपक्रम राबविणे हा उद्देश आहे.

येत्या 26 डिसेंबर 2021 रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख महिला महाविद्यालय अमरावती येथे साहित्यिका प्रा. प्रतिभा सराफ यांच्या अध्यक्षतेखाली शब्दवेल साहित्य संमेलन आयोजित केले आहे.
उद्घाटक म्हणून युवा कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य मा. पुष्पराज गावंडे आहेत.

डॉ. स्मिता देशमुख ह्या स्वागताध्यक्ष तर शब्दवेलच्या सन्माननीय सल्लागार अंजली ढमाळ कार्याध्यक्ष आहेत. प्रमुख अतिथी मध्ये तेजराव पाचरणे (राज्यकर सहआयुक GST विभाग अमरावती) मा श्याम ठक (संस्थापक अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच, अकोला) डॉ. मंदा नांदूरकर, डॉ. संयोगिता देशमुख असणार आहेत.
उद्घाटन सोहळय़ानंतर साहित्यिका मेघना साने यांच्या अध्यक्षतेखाली व ललिता गवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रितांचे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात विद्या बनाफर यांचा एकपात्री प्रयोग तर साहित्यिक, मा. बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेखाली व नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रितांचे कविसंमेलन आहे. तद्नंतर डॉ. सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल.

सर्वांनी या साहित्यिक मेळाव्यात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्र आवाहन आहे.

– लेखन : प्रविण जगन्नाथ बोपुलकर
अध्यक्ष, शब्दवेल साहित्य मंच
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
