आज पुन्हा त्या वळणावर,
कोणी मला आवाज दिला
थबकून पाहता जाणवले मना
तो एक भास-आभास जीवा…..
हातून निसटल्या वाळू कणांपरी
त्या वाटेवरील सुखद स्मृती..
अन राहिली त्यांची खंत उरी
नयनातील अश्रूंच्या संगती….
मार्ग चालता त्या वाटेवर
वेचून घेतो मी नजरेतून
आपुल्या प्रीतीचे ते मधुकण
मम मनातील शुभ्र पटावरी
अलगद उमलते रंगीत चित्रण
एकांतातही कधी वाटते
तुझ्या प्रेमाची ती फुलपाखरे..
मम मनातील मधुर स्मृती
चाखूनी तृप्त होऊन कानी सांगती
जाणवते त्यांना अजून तीच प्रीती
तू नसशी इतकेच वेगळे
बाकी सर्वच तसेच आगळे
निघून गेलीस तू दूरवरी
क्षणोक्षणी आजही मला
तव आठवणींचा काहूर त्रस्त करी
– रचना : साधना आठल्ये.🌻🌿
Very nice