Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यनवीन काय आहे ?

नवीन काय आहे ?

संपले वर्ष सारे
त्यात नवीन काय आहे?
संपते रोज सारे
त्यात नवीन काय आहे ?

येणारे सारे जाणार आहे
त्यात नवीन काय आहे ?
आजचे उदया नसणार आहे
त्यात नवीन काय आहे ?

हसणारे सारे आज
उदया रडणार आहे
त्यात नवीन काय आहे ?

जात्यातले सुपात आहे
सुपातले जात्यात जाणार आहे
त्यात नवीन काय आहे ?

आज असणारे उदया नसणार
संपेल वर्ष त्यात नवीन काय आहे ?

आपल्या आयुष्याचे हे ही वर्ष,
संपले आहे त्यात नवीन काय आहे ?

विलास कट्यारे

– रचना : विलास कट्यारे

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments