दुबई येथे नुकत्याच झालेल्या, वर्ल्डकप डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत टांझानियाचा 21/6 व 21/3 असा पराभव करून भारताने अंतिम विजेतेपद पटकावले.
याआधी सेमी फायनलमध्ये कॅनडाचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कॅनडाने भारतीय संघाला कडवी झुंज दिली. अंतिम फेरीत फुलचंदने नेट जवळून मारलेले बॉल विरुद्ध संघाला उचलताही येत नव्हते. त्याने प्रत्येक सामन्यात उत्तम खेळ केला तर सोयब बेगमपुरे यांच्या अप्रतिम सर्व्हिस शॉट, तर यासिनने नेटमनची जबाबदारी उत्तम केली.
कर्णधार बिपीन चहलने कोपऱ्यातून मारलेले बॉल व उपकर्णधार अंकुश पाठक यांने मिडलवरुन मारलेले शॉट प्रेक्षकांची वाहवा मिळवत होते. चिंतन, धीरज, बिरजू, मलिक, वासू यांनीही उत्तम खेळ करुन विजयात भर टाकली.
विजयी भारतीय संघाचे कोच रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक तथा राज्य क्रीडा संघटक शरद कदम हे आहेत.
भारताने विजय प्राप्त केल्याबद्दल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा.डी.बी.साळुंके, उपाध्यक्ष तथा राज्याचे सचिव प्रा.दिपक मोकल क्रीडा क्षेत्रातील वरिष्ठ, विविध मान्यवरांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.
– टीम एनएसटी. 9869484800
अभिनंदन!