आले, बैसले, चालले
झाले साल पाठमोरे
नव्या उषेला, आशेला
चला जाऊ या सामोरे
पुस्तकाचे नवे पृष्ठ
म्हणविते नवे वर्ष
दडे रहस्य, रोमांच
डोळा पाणी, मनी हर्ष
रमविते पानपान
शिकविते चार धडे
रिचवून, गिरवून
जाऊ समृद्धीने पुढे
हृद्य विद्य संचिताचे
जपू संदर्भ हे सारे
फुलबाग फुलो रोज
वाहो सुगंधित वारे
करू जल्लोश आणिक
थोडे चिंतन मंथन
उजळावे मन मन
हेच अभिष्टचिंतन

– रचना : डॉ. स्वाती घाटे
अभिष्टचिंतन फार सुंदर शब्द रचना. नव्या उषेला आशेला चला जाऊ या सामोरे . अनेक प्रश्नचिन्ह समोर असताना नवीन वर्षाचे स्वागत कसे करावे असे विचार अस्वस्थ करतात. स्वाती घाटे ह्यांनी उत्तम विचार मांडले आहेत…