48 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट नांदेड येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियमवर काल पासून सुरु झाली.
पहिल्या दिवशी मुंबई, हैदराबाद, पुणे व पंचकुला हरियाणा संघाना सहज विजय मिळाले, तर आर्टलरी नाशिक आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाना मात्र समान गुणावर सामना सोडावा लागला.
पहिला सामना
एक्सलेंस हॉकी अकादमी पुणे आणि हॉकी औरंगाबाद संघा दरम्यान खेळविण्यात आला. पुणे संघाने सुरुवातीच्या 5 व्या मिनिटालाच रोमेश पिल्ले यांच्या मैदानी गोलने आघाडी मिळवली. त्यानंतर प्रणव माने याने 12 व्या मिनिटाला पुणे संघासाठी मैदानी गोल केला. खेळाच्या 44 मिनिटास आदित्य रसाला याने मैदानी गोल करून संघाचा विजय निश्चित करून दिला. हैदराबाद संघाने सामन्यात परत येण्याचे प्रयत्न करत 48 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोल मध्ये केले. इमरान खान याने गोल केला. पुणे संघाने 3 विरुद्ध 1 फरकाने सामना जिंकला.
दूसरा सामना
डेक्कन हैदराबाद विरुद्ध रिपब्लिकन मुंबई यांच्यात झाला. डेक्कन हैदराबाद संघाने हा सामना 5 विरुद्ध 0 असा जिंकला. हैदराबाद तर्फे दिशांत पद्माकर याने 8 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंनी 24, 33, 36 आणि 53 व्या मिनिटाला गोल करून सामना एकतरफा ठरविला.
तिसरा सामना
आर्टलरी नाशिक विरुद्ध मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यात खेळविला गेला. दोन्ही संघाना गोल करता न आल्याने शेवटी सामना अनिर्णीत राहिला. दोन्ही संघाना एक – एक गुण वाटून देण्यात आले.
चौथा सामना
पंचकुला हरियाणा विरुद्ध इलेवन स्टार अमरावती संघा दरम्यान झाला. हरियाणा संघाने 1 विरुद्ध 0 अंतराने सामना ताब्यात ठेवला. हरियाणा साठी 15 व्या मिनिटाला शुभमने गोल केला.
5 वा सामना
कस्टम मुंबई विरुद्ध चार साहिबजादे हॉकी अकादमी नांदेड संघात खेळला गेला. मुंबई संघाने नांदेड संघावर 7 – 0 असा मोठा विजय मिळवला. मुंबई तर्फे 10 व्या, 17 व्या, 30 व्या, 33 व्या, 34 व्या 52 व्या व 58 व्या मिनिटाला गोल करण्यात आले. इक्तिदार इशरत आणि जयेश जाधव याने दोन दोन गोल केलेत.
सहावा व शेवटचा सामना
एस. एस. क्लब अमरावती विरुद्ध खालसा यूथ क्लब नांदेड संघात झाला. अति संघर्षपूर्ण खेळात अमरावती संघाने नांदेड संघाचा 2 विरुद्ध 0 असा पराभव केला. नदीम शेख याने 9 व्या मिनिटाला पेनल्टी कार्नर मध्ये गोल केला. तर आकिब मोहम्मद याने 40 व्या मिनिटास मैदानी गोल केला.
पंचाची भूमिका परमेश्वर मरांडी, अश्वनी कुमार, रमीज कुरैशी, ओमकार कावरे, राजकुमार झा, दीक्षित एस. एन., अविराज मडगावकर अरुण सिंह, सुमित मोहिते यानी पार पाडली.
हॉकी कमेटी अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब यांच्या मार्गदर्शनात सर्व सामने निर्विवाद पार पडले. यासाठी हॉकी कमेटीचे सदस्य स. जीतेन्द्रसिंह खैरा, स. जसपालसिंह काहलो, स. हरविंदरसिंह कपूर, स. संदीपसिंह अखबारवाले, स. महेंद्रसिंघ लांगरी, स. हरप्रीतसिंघ लांगरी, स. महेंद्र सिंघ गाडीवाले, स. अमरदीपसिंघ महाजन, श्री विजय कुमार नंदे, स. जसबीरसिंघ चीमा, प्रा. डॉ जुझार सिंघ सिलेंदार, स. डॉ भीमसिंघ यांनी परिश्रम केले.
– लेखन : रवींद्रसिंघ मोदी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800