संपलं एकदाचं एकविसावं वर्ष
नकोच त्या आठवणी
ती आणिबाणी
जगण्यासाठी चाललेली
जिद्द आणि धडपड
सगळेच दरवाजे झाले होते बंद
मोजत होतो क्षण
शोधत होतो आनंद
आणि आता बाविशित शिरतोय आपण
आरोग्यासह नव्याने
पुन्हा शोधू आनंद
पुन्हा उत्सव पुन्हा जल्लोश
पुन्हा घेऊ या भेटीगाठी
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उठू या
नव्या उमेदीने
नव्या जिद्दीने
नवे जीवन जगू या.

– रचना: नीता देशपांडे