Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
बोलता बोलता, या वर्षांचा पहिला आठवडा संपला .आता ओढ पुढच्या आठवड्याची, कारण अर्थातच मकर संक्रांतीची☺️
तिळगुळ घ्या आणि गोड बोला, ही आपली संस्कृती जपू या !
या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक

धाडसी “समाजभूषण” सुंदर लेख👌👌
– अशोक जवकर
निवृत्त उप मुख्य अभियंता, बेस्ट. मुंबई

येळवस या नवीन सणाची माहिती मिळाली. धन्यवाद.
– सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक

माझे प्रिय वर्गमित्र ब्रिजकिशोर छगनलालजी झंवर यांचा आजचा लेख आवडला, ब्रिज आणि मी सोबत सोबत गेली अनेकवर्ष हदगावला पत्रकारिता केली होती.

आदरनिय जयप्रकाश दगडे यांचा येळआमवशा बद्दलचा लेख वाचुन मी मला लातूरला बी.एड् ला असल्याची आठवण झाली☺️
– अनिल दस्तुरकर. नांदेड

तोरणेसरांंनी, समाज भूषण, पुस्तकाचे उत्तम परीक्षण केले आहे. ज्यांनी पुस्तक वाचले नसेल त्यांनी हे परीक्षण जरुर वाचावे… 🌹🙏
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक

समाजभूषण👌
– हरिहर पांडे.

समाजभूषण विषयी आपलें मनस्वी अभिनंदन💐🙏🏻, हा आपला उत्साह आणि प्रेरणा आम्हाला मार्गदर्शन करणारी आहे, हार्दिक अभिनंदन सर.
– मीरा ढास.
सहाय्यक संचालक
(माहिती). औरंगाबाद

श्री सुधाकर तोरणे यांचा लेख आवडला.
– अशोक लोखंडे.
निवृत्त कृषी संचालक
मुंबई

तोरणे साहेब उत्तम परीक्षण करून एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद साहेब.
– निरंजन राऊत.
निवृत्त वरीष्ठ सहाय्यक संचालक,(माहिती)

श्रीमान दगडेजी
स.न.वि.वि.
येळवस सणाबद्दल सविस्तर माहिती दिल्यामुळे सीमावासीय संस्कार ती सर्वांना समजली. त्याबद्दल आपणास
खूप खूप धन्यवाद.
👌💐🙏
– गंगाधर घुमाडे, पुणेे.

प्रा.विसुभाऊ बाप्पांना, पुन्हा, पुन्हा ऐकण्यात एक वेगळीच मजा असते धन्यवाद.
– विलास प्रधान.

अनाथाची माय अप्रतिम माहिती मिळाली
– शोभा कोठावदे.

अनाथाची माय, अतिशय सुंदर लेख. आपले हार्दिक धन्यवाद.

होतील बहु, पण, अश्या व्यक्ती, पुन्हा होणे नाही, अनाथांची मायला, आदरांजली अर्पण करून, अभिवादन
– विलास प्रधान
मुंबई

सर्व सख्यांच्या कविता सिंधू ताईचे सार्थ वर्णन करणा-या, छान आहेत😢🙏
– मंजिरी कुलकर्णी

राणी दुष्यंत खेडीकर यांनी केलेल्या कार्याला सलाम.

त्यांचा लेख *महाराष्ट्राचा चांगुलपणा* च्या दोन्ही ग्रुप मध्ये अपलोड केला जाईल.

देशाचा अभिमान – अलौकिक मुले.
सर्व बाल पुरस्कारांची माहिती मिळाली.
धन्यवाद… भुजबळ सर-
– साहेबराव माने पुणे🙏

सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त त्यांचा जीवनपट उलगडून दाखवला ब्रिजकिशोर सरांचे आभार🙏🏻
पूर्णिमा शिंदे यांची तेजस्वी सावित्रीबाइंची ओवी अतिशय सुंदर रचना 👌🏻👌🏻👌🏻
आदर्श शिक्षिका अल्पनाताई यांची माहिती मनाला स्पर्श करून गेली अतिशय कठीण परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले आणि स्थिरावल्यानंतर परत नियतीने आघात करावा मनाला हे पेलवतच नाही तरीही त्यांनी परत स्वतः ला सांभाळले आणि त्या मुलांच्या आई बनल्या सल्यूट या मातेला🙏🏻धन्यवाद रश्मीताई
बळीराजाची येळवस एक वेगळीच माहिती समोर आली. अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद दगडे सर
देवेंद्र सर आणि टीम चे आभार आणि अभिनंदन 💐 धन्यवाद अलकाताई.

समाजभूषण पुस्तकातील सर्व नायक नायिकांना मानाचा मुजरा देवेंद्र सरांचे अभिनंदन. तोरणे सर धन्यवाद🙏🏻
शाब्बास नितीन पत्रकारिता पुरस्कार बद्दल अभिनंदन💐
कुटुंब रंगलंय काव्यात भाग १० विसूभाऊ बापट यांचा लेख छान.
नवी आव्हाने पेलत पुनश्च उभे राहण्याचे आव्हान खूप छान👌🏻तनुजा प्रधान यांची कविता सुंदर धन्यवाद तनुजा ताई🙏🏻न्यूज स्टोरी टीम आणि देवेंद्र साहेब यांचे आभार, धन्यवाद अलका ताई🙏🏻

माईंच निधन मनाला चटका लाऊन गेलं. त्यांचे आजारपण केव्हा पासून होते काहीच माहीत नव्हतं त्यामुळे अचानक बातमी आली आणि हदरायला झालं. त्यांचं कार्य खूप मोठं होत. अतिशय बिकट परिस्थितीतून वाट काढत सोबत अनाथांना घेऊन पुढे जाणे म्हणजे… त्यांचं आयुष्य आकलन शक्ती च्या बाहेर आहे. असो
माईंच्या वरील सर्व लेख आणि कविता खूप छान सादर केल्या आहेत सर्वांचेच आभार 🙏🏻 धन्यवाद देवेंद्र जी आणि अलका ताई🙏🏻

मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या बद्दल खूप छान माहिती मिळाली आणि सिंधदुर्ग जिल्ह्याचे होते हे ऐकून अधिक आनंद झाला. मस्तच देवेंद्र सर👍
नीला बर्वे यांचा अलौकिक मुले देशाचा अभिमान हा लेख खूप आवडला खूप कर्तुत्व वान मुलांची माहिती मिळाली ती ही 26 जानेवारी यायच्या आधीच सही 👍नीला ताई.
राणी खेडीकर यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारा बद्दल हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा🙏🏻
ओठावरल गाणं उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी राज्य करी वरील मेहनतीचं महत्व सांगणारं विकास भावे सरांचे रसग्रहण उत्तम👍
नीता ताईंची नवे वर्ष नवी उमेद कविता सुंदर👌🏻
धन्यवाद देवेंद्र जी आणि अलकाताई🙏🏻🙏🏻🙏🏻

डॉ. गव्हाणे यांचा पत्रकारिता वरील लेख सामाजिक आर्थिक स्वातंत्र्या साठी लेखणी झिजवावी उत्तम👌🏻
हरिहर पांडेजींचा माईंवरील लेख छान
त्या महानुभाव पांथातील पहिल्या पद्मश्री पुरस्कारविजेत्या होत्या हे समजले.
सुनिता नाशिककर ताईंचा लेख अंगावर काटा आणणारा होता. रात्री थंडीत कुडकुडत त्यांनी आपले कर्तव्य बजावले.👏🏻👏🏻👏🏻
बातमीदारी करताना मध्ये….
डॉ.किरण ठाकूर यांनी युनिवार्ता ची यशस्वी वाटचाल सुंदर रीतीने मांडली.
मनोहर झोरे यांची पत्रकार कविता खूप सुंदर👌🏻धन्यवाद देवेंद्र भुजबळ साहेब आणि अलकाताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
– सुप्रिया सावंत.

आणि मी पोलिस अधिकारी झाले ! भाग ६
Nashik kar madam is my best friend .And I feel proud for my frnd.She was best officer.,also she is best human being
– Vidyalaxmi Shamshankar Rajhans

पत्रकार
अप्रतिम रचना,
कोणत्या पत्रकाराच्या पत्रकारितेला बघून केली ते कळलं तर बरं होईल
– मिलिंद

डॉ. राणी खेडीकर : राष्ट्रीय पुरस्कार व पुस्तक प्रकाशन
अभिनंदन !!! डॉ. राणी खेडेकर madam! पुढे येणाऱ्या लेखनास खूप खूप शुभेच्छा!
– वर्षा महेंद्र भाबल

देशाचा अभिमान : अलौकिक मुले
खरोखर फार फार कौतुकास्पद आहेत हि सर्व मुले/मुली. इतक्या लहान वयांत केवढा मोठ्ठा पल्ला त्यांनी गाठला आहे. त्यांनी असेच खुप शिकावे व त्यांचे ध्येय मिळवावे. व भारताचा मानाचा तिरंगा जगभर फडकवावा. त्यासाठी भरघोस शुभेच्छां व शुभ आशिष. माहितीबद्दल नीला बर्वे यांना धन्यवाद.
– लीना फाटक. यु.के.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
आदरणीय भूजबळ साहेब दर्पणकारांबद्दल छान
माहिती देऊन त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली.
इतकेच नव्हे तर त्यांचा मौलिक आदर्श समोर ठेवून
आपण न्यूज स्टोरी टुडे घ्या माध्यमातून त्यांच्यासारखे
देशकार्य आपण तळमळीने करीत आहात.एका विशिष्ट
ध्येयाने झपाटलेलं आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व खूपच
वंदनीय आहे.वैचारिक सुगंध देणारं आपण चंदनी खोड
आहात.तुम्ही ज्या खडतर प्रवासातून पुढे आलात तो
संपूर्ण प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.व अशा अनेक
व्यक्तिंनाही तुम्ही टुडेच्या माध्यमातून वाचकांसमोर
आणत आहात.समाज घडवणारे आपण दीपस्तंभ आहात.आपल्या या मौलिक राष्ट्र सेवेचा
वाटतो आम्हा खूप अभिमान
आपण आहात देशाची शान
जनतेच्या ह्रुदयात मिळवलत
आपण आदराचं स्थान
पत्रकारिता दिनाच्या आपणास
खूप खूप शुभेच्छा
प्रभूकृपेने पूर्ण होवोत
आपल्या सर्व इच्छा
– राजेंद्र वाणी, दहिसर, मुंबई.

*अनाथांची माई*
सिंधुताईंना श्रद्धांजली वाहणार्‍या सर्वच कविता भावपूर्ण…
– राधिका भांडारकर

सिंधुताई सपकाळ आज स्वर्गवासी झाल्या व त्यांनी सांभाळ केलेली अनाथ मुले/मुली पोरकी झाली. स्वत: कठिण परिस्थितीतून जाऊनहि अनाथ बालकांच्या त्याच आधार झाल्या. सर्व लेख व कविता खुप खुप भावपूर्ण आहेत. या थोर समाजसेविकेला मी माझी आदरयुक्त श्रद्धांजली वाहते. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो व त्यांचे समाजसेवेचे कार्य पुढे सुरू राहून वृद्धींगत होवो.
– लीना फाटक. यु.के.

*अनाथांची माय*
अनाथांची माय या शीर्षकाखाली ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानिमित्त प्रकाशित केलेला प्रेरणादायी जीवनपट वाचून मन आगळ्यावेगळ्या विश्वात गेला आहे. सिंधुताई व्याख्यान लेखात सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीचा यांच्या मुलीचे छान या यादीत मध्येच मुलीचे छायाचित्र आणि ममता बाल सदन आची पाटील दाखवून आपण फार मोठे काम केले आहे. या छायाचित्रांमुळे या छायाचित्रांमुळे लेखाला चे महत्व फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सिंधुताई सपकाळ यांच्या 2-3 कार्यक्रमांना मी प्रत्यक्षात उपस्थित राहिलो आहे. सरोदे परिवारा मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे.
– विलास बाबुराव सरोदे

अनाथांची माय, “माई” ना “भावपूर्ण श्रद्धांजली” स्वतः अतिशय काबाडकष्ट करून अनाथ मुलांना वाढवलं चांगले संस्कार दिले, त्या अनाथांची आई झाली. देवाने सुद्धा किती परीक्षा घेतली आणि सतत परीक्षा घेतली पण माई सतत उत्तीर्ण होत गेल्या. संकट आणि कष्ट हे त्यांचं रोज च जीवन आहे ,असंच त्यांच्या जीवन जगण्या वरून वाटते कष्ट सोसण्याची किती प्रचंड ताकद त्यांच्यात होती. त्यावेळच्या व्यवस्थेनुसार त्यांनी समाजाला किती धैर्याने तोंड दिले डोंगरा एवढी हिंमत त्यांच्यात दिसून येते माई कडून सर्वांनी हीच प्रेरणा घेऊन आपले जीवन व्यतीत करावे हीच खरी त्यांच्याप्रती श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद
अतुल एस गरगडे

अतिशय उत्तम लेख…माईंचा पूर्ण जीवनपट उलगडला. किती कठीण प्रसंगांना तोड दिले या माउलीने. भावपूर्ण आदरांजली
– प्रीती भिसे, बेंगलोर

ऋणानुबंध हा एकमेकांप्रती असलेल्या भावनेतून, पाहण्याच्या दृष्टिकोणातून निर्माण होत जातो. हा लेख नसून मुलाने आईची महती सांगणार एक स्वानुभवाचं चित्र वाचकांच्या मनावर कोरलं आहे. माईंना विनम्र अभिवादन व श्री दगडे साहेबांच्या लेखन विचारांस सलाम…..
– रितेश सुरेश दुरुगकर

अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांच्या निधनामुळे त्यांची मुले पुन्हा एकदा अनाथ झाली. स्वतःच्या व स्वतःच्या मुलीच्या पोटा पाण्यांची भ्रान्त असताना हजारो अनाथ मुलांचे पालन पोषण केले. नुसतेच पालन पोषणच केले नाही तर त्यांना शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभे केले. संसार थाटून दिला. मुक्या गायी ची सेवा करत आहेत. त्यांनी चालू केलेल्या कार्याला सलाम. हे परमेश्वरा त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभू दे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹
– मोहन आरोटे

अतिशय सुंदर लेख..भावपूर्ण .आठवणी जागवणारा.
अंत:करणातून ऊतरलेला…
– राधिका भांडारकर

अनाथांची माय..उत्तम लेख. डोळ्यात पाणी आणणारा!
माईंची ममतेची ताकद पाहून आपण थक्क होतो.
– मेघना साने

अतिशय सुंदर, मनोरंजक लेख.
सामान्य माणूस आणि पोलीस यांच्या भेटीत एका बाजूला भयच असते..पण बापटांची सुरवात भयापासून झाली.
तरी समारोप मैत्रीत झाला हे फारच गंमतीदार
या कुन्देदु ची समश्लोकी आवडली.
– राधिका भांडारकर

बापट यांचा कार्यक्रम रंगतोच. पण मुलाखतही रंगली छान ! त्यांना भेटल्यासरखे वाटले.
– मेघना साने

*बळीराजाची “येळवस”*
सामाजिक चाली रीती मागं काय सामाजिक विज्ञान आहे हे माहीतगार व जिज्ञासूंच अभासकरून लोकांपर्यंत पोहोंचवू शकतात.अज्ञानामूळे आज सुशिक्षीत अशा परंपराना थोतांड समजतात ती अशा अभ्यासूं लिखाणाने सुज्ञ होतात.लिखीत असल्यामुळे इतिहास लिहिल्या जाते, आज चा संदर्भ लिखाणात दिसतो व त्यामुळे उद्यासाठीं ते पथदर्शक ठरते.म्हणून हा लेख काल,आज आणि उद्या करितां पोषक वाटतो.जर रेकाॅर्ड केल्या नाहीत तर अलिखित गोष्टीवर काळ घात करून पुसून टाकतो.
– डाॅ. पुरुषोत्तम दरख. औरंगाबाद.

*धाडसी “समाजभूषण”*
समाजभूषण हे वाचलेच पाहिजे असेपुस्तक आहे
सुधाकर तोरणे यांनी छान परीक्षण केले आहे..
– राधिका भांडारकर

श्री देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीत आणि सुंदर शब्दांत साकार केलेल्या ‘समाज भूषण’ ह्या पुस्तकाचे परिक्षण नव्हे तर पुस्तकाचं सार व्यवस्थितपणे श्री सुधाकर तोरणे सरांच्या लेखणीतून उतरलेलं आहे. लेखक व परिक्षक दोघांचेही खूप खूप अभिनंदन.
– ओमप्रकाश शर्मा

*सावित्रीबाई फुले : महिला शिक्षणातील अग्रणी*
सावित्रीबाई फुले यांच्या👍 जयंती निमित्त, महिला शिक्षणाचा खंबीर पाया उभारण्याचे कार्य, नेटाने समाजात चालवणाऱ्या आदरणीय शिक्षिकेस, विनम्र अभिवादन ! 🙏
– सौ. वर्षा भाबल.

*आदर्श शिक्षिका अल्पनाताई पालकर*
अल्पनाताई पालकर यांची जीवनकथा वाचल्यावर एक जाणवते की, समस्यांचा निडरपणे सामना करणार्‍यांना जगण्याचा मार्ग सापडतो.
– राधिका भांडारकर

नमस्कार 🙏, सर्वात प्रथम रश्मी ताई हेडे यांचे मनापासून आभार मानतो माझी बहीण अल्पना ताई विषयी आपण जे काही लिहिलं आहे ते खरोखर अभ्यास पूर्ण आहे.
आम्हाला सर्व भावांना अभिमान वाटावे असेच कर्तृत्व आहे आमच्या बहिणीचे आणि हे सर्व अतिशय जिद्दी ने शांत पणे कोणाला ही न दुखावता तिने मिळवले आहे परमेश्वर तिला संपूर्ण आरोग्य सुख आणि शांतता पूर्ण आयुष्य देवो हिच प्रार्थना.
– संजय सासवडे

वा ! खूपच सोशिक् आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व!🙏🏻🙏🏻🙏🏻
– प्राजक्ता जोशी.. गीता ग्रुप सातारा

खूप छान👌👌👌 अतिशय समर्पक शब्दात लेखन केलेले आहे……
– राधिका बामणे. सातारा

खुपचं छान वन्स….😘
खरचंं खुप अभिमाण वाटतो तुमचा….🙏🏻

So proud of you….😘😘
– ज्योती सासवडे. पुणे

खूप खूप खूप छान 👌👌👌👌💐💐💐💐💐🥰😘

We all proud of you dear vans🥰😘🥰😘💐💐💐💐

खूप अभिमान वाटला हे सर्व वाचून
पण थोडी emotional झाले

Evdya bhari teacher aamchya Tai aahet so we r so lucky ☺️☺️

Tai zabardast vyaktimatv aahe kharach !!
Hats off 👏👏
Tumcha prawas khupach Chan mandala aahe
– भाग्यश्री डिमके .. वडगाव शेरी पुणे

अल्पना मुळातच हुशार आणि जिद्दी होती. ती माझी पुतणी नसून मुलगी च आहे. याचा मला खुप अभिमान आहे.
-चंद्रकांत गणपती सासवडे

किती सुंदर लिखाण आहे….👍
Really proud movement..👏👏
ताई you are great..🍫🍫💐💐
खुप छान लिहिले आहे
– श्रद्धा कासार. सातारा

अल्पना पालकर या माझ्या नणंदच नाहीत तर त्या माझ्या चांगल्या मैत्रीण ही आहेत.
त्यांचे आतापर्यंतचे प्रवास वर्णन वाचून थोडे भावनिक झाले आणि अभिमानाने ऊरही भरून आला. त्यांची त्यांच्या कामाप्रती निष्ठा, परिश्रम हे आम्ही अगदी जवळून पाहिलंय त्याचेच फळ म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात.
तुम्हाला यश, उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
– पुनिता सासवडे.

*तेजस्वी सावित्रीबाईंची ओवी*
चवदाही ओव्या छान
– राधिका भांडारकर

*नववर्षाचे अभिष्टचिंतन*
अभिष्टचिंतन फार सुंदर शब्द रचना. नव्या उषेला आशेला चला जाऊ या सामोरे . अनेक प्रश्नचिन्ह समोर असताना नवीन वर्षाचे स्वागत कसे करावे असे विचार अस्वस्थ करतात. स्वाती घाटे ह्यांनी उत्तम विचार मांडले आहेत…
– सुनंदा पानसे

*नवीन काय आहे ?*
निसर्गाचा नियम आहे.

*दुबई : वर्ल्डकप डायरेक्ट हॉलिबॉल स्पर्धेत भारत अजिंक्य*
अभिनंदन !
– प्रीति परदेशी

*ज्ञानसूर्य वि. का. राजवाडे*
खुप माहितीपूर्ण सविस्तर, सुंदर लेख. धुळ्याच्या सर्व contact वर पाठवला. अभिमान वाढला. खुप खुप धन्यवाद.
– लीना फाटक, यु.के.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments