आयुष्यावर बोलू काही….
आयुष्यावर बोलू काही….
पण विषय मला सुचत नाही
पण विषय मला सुचत नाही
सर्वीकडे झाली आहे शहंशाह
भावना, मन, प्रेम आता उरले नाही
तरीही मला वाटते
आयुष्यावर बोलू काही.
पूर्वी दूर असूनही तू जवळ राही
भावनांचा बांध प्रेमाच्या पार राही
आता तू जवळ असूनही
मनाने खूप काही दूर राही,
माणसं माणसाला ओळख देईनही,
अशी झालीये दुनिया सारी
तरीही मला वाटतं
आयुष्यावर बोलू काही….
भावनांची वाट चुकली,
मानसन्मानाची इज्जत लुटली
माणसं माणसांना ओळखतही नाहीत
सगळीकडे आता अराजकता माजली
तरीही मला वाटतं आयुष्यावर बोलू काही
आयुष्यावर बोलू काही…..
भाऊ भावाला ओळखत नाही
मुलं आई वडिलांना सांभाळत नाही
दैना अवस्था झाली या कलियुगाची,
आयुष्य जगण्यात आता रसच नाही
तरीही मला वाटते आयुष्यावर बोलू काही.
आयुष्यावर बोलू काही….
ओढून झाले पाय आता खूप
आणि करून कुरघोड्या भरपूर
पुरे झाली चेष्टा या मानव जन्माची
आता तरी प्रेम, सन्मानने वाग तु भाई
तरच माणुसकीच्या या जन्माला
अर्थ राहील हो काही
आजही मला वाटते
आयुष्यावर बोलू काही…
आयुष्यावर बोलू काही….

– रचना : निशिकांत धुमाळ